घरभविष्यआजचे राशीभविष्यशुक्रवार, २९ मार्च २०१९ राशी भविष्य

शुक्रवार, २९ मार्च २०१९ राशी भविष्य

Subscribe

मेष ः- तुमचे जुने डावपेच यशस्वी होतील. नोकरीचा प्रश्न सुटेल. मोठ्या लोकांच्या सहवासाने फायदा होईल.

वृषभ ः- हाय ब्लड प्रेशरचा त्रास संभवतो. छोटेसे ऑपरेशन करण्याची वेळ येऊ शकते. सल्ला घ्या.

- Advertisement -

मिथुन ः- महत्त्वाची कामे होतील. आजच प्रयत्न करा. नवीन ओळखीने धंद्यात जम बसेल. थकबाकी घ्या.

कर्क ः- समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. फायद्यासाठी कोणावरही विश्वास टाकू नका.

- Advertisement -

सिंह ः- आजच्या कामात आजच यश मिळवा. भेट घेता येईल. सौम्य धोरण ठेवा.

कन्या ः- घरगुती वाटाघाटीत तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. जवळच्या व्यक्तीचा दुरावा संभवतो.

तूळ ः- नोकरीचा प्रयत्न करा. ओळख वाढेल. स्पर्धेत जास्त मेहनत घ्यावी लागेल.

वृश्चिक ः- तुमच्या कामाला योग्य दिशा मिळण्याचे चिन्ह दिसेल. मित्र मदत करतील. वरिष्ठ तुमची मदत घेतील.

धनु ः- घेतलेला निर्णय योग्य होता असे वाटेल. मनावरील ताण हलका होईल. विरोधक नमतील.

मकर ः- समस्या वाढतच आहे असे वाटेल. भलत्या जाळ्यात अडकू नका. व्यसनाने फसगत होईल.

कुंभ ः- आजचे काम उद्यावर टाकू नका. प्रेमाची माणसे भेटतील. कोर्टात प्रभाव पडेल.

मीन ः- तुमच्या कार्यात वरिष्ठांचा सहभाग असेल. जवळचे लोक मनातून तुम्हाला कमी लेखतील. खर्च वाढेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -