घरभविष्य३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरचे राशीभविष्य

३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरचे राशीभविष्य

Subscribe

 

मेष ः– तुला राशीत बुध प्रवेश सप्ताहाच्या शेवटी होत आहे. चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. मन खंबीर ठेवता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात जास्त परिश्रम घ्यावे लागतील. तुमचे विचार आणि महत्त्व पटवून देणे सोपे नाही. धंद्यात शांतपणे व्यवहार करा. बोलण्यात चूक करू नका. संसारातील समस्या कमी होतील. मुलांकडे लक्ष द्यावे लागेल. कला-क्रीडा-साहित्यात प्रसिद्धीसाठी प्रतीक्षा करावी लागेल. कोर्ट केसमध्ये नम्रतेने बोला. शेअर्समध्ये गुंतवणूक योग्य सल्ल्याने करा. सल्ल्यासाठी तुम्ही भेटू शकाल. परीक्षेत यश मिळेल. संशोधन कार्यात पोलीसवर्गाला वरिष्ठांची नाराजी सहन करावी लागेल. नोकरीत लक्ष देऊन काम करा. शुभ दि. 30, ६

- Advertisement -

वृषभ ः– सूर्य चंद्र त्रिकोण योग, तुला राशीत बुध प्रवेश होत आहे. कोणतेही महत्त्वाचे काम याच सप्ताहात करून घ्या. नंतर अडचणी वाढू शकतात. धंद्यात काम मिळवा. कार्यात तुमच्या योजनांच्या पूर्णतेकडे दुर्लक्ष करू नका. वरिष्ठांचा पाठिंबा राहील. संसारात वादविवाद टोकाला जाऊ शकतो. कारण शोधून काढा. कला-क्रीडा-साहित्यात कल्पनाशक्तीला चालना मिळेल. चमकदार यश दिसेल. कोर्टकेस संपवण्याचा प्रयत्न करता येईल. मैत्रीत तणाव होऊ शकतो. संशोधन कार्यात यश मिळेल. परीक्षेसाठी मुलांनी खराखुरा अभ्यास करावा. नाटकीपणा करू नये. स्वतःला फसवू नये. नोकरीत स्वतःचे काम स्वतःच तपासून पहा. शुभ दि. २, ३

मिथुन ः– रविवार कामात अडचणी येतील. प्रवासात सावध रहा. वाद वाढवू नका. तुलेत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. पद मिळेल. त्याचा उपयोग स्वार्थासाठी न करता लोकांच्या सेवेसाठी करा. धंद्यात मोठे काम मिळेल. थकबाकी वसूल करा. शेअर्समध्ये फायदा होईल. चांगली गुंतवणूक करता येईल. घरात आनंदी वातावरण राहील. मुलांची, जीवनाची प्रगति होईल. कला-क्रीडा साहित्यात चमकाल. पुरस्कार मिळेल. पैसा मिळेल. कोर्टकेस लवकर संपवण्याचा प्रयत्न आत्तापासूनच करा. संशोधन कार्यात तुमचे कौतुक होईल. मोठे काम करून दाखवाल. परीक्षेत चांगले यश मिळेल. आळस करू नका. नोकरीत बदल करता येईल. शुभ दि. ३,४

- Advertisement -

कर्क ः– रविवार महत्त्वाची भेट घेता येईल. तुमच्या कार्याला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. तुलेत बुध प्रवेश, चंद्र, मंगळ प्रतियुति होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचे धडाकेबाज काम बघून जवळचे लोक काड्या घालण्याचा प्रयत्न करतील. शांत रहा. तुमचा राग वाढवून तुमची प्रतिष्ठा कमी करण्यासाठी डाव टाकतील. धंद्यात काम मिळेल. नवीन ओळख वाढवा. थकबाकी मिळवा. कला-क्रीडा-साहित्यात तुमच्या कलागुणांना पुढे जाण्याची संधी मिळेल. कल्पना सुचेल. कोर्ट केसमध्ये नम्रतेने वागा. संशोधन कार्यात यश मिळेल. कुणाला दुखवू नका. परीक्षेसाठी आळस न करता अभ्यास करा. पोटाची काळजी घ्या. शुभ दि. ५, ६

सिंह ः– रविवार उत्साहाचा व आनंदाचा असेल. ठरविलेला कार्यक्रम तुमच्या मर्जीनुसार पूर्ण करता येईल. महत्त्वाची चर्चा करता येईल. तुलेत बुध प्रवेश, चंद्र, मंगळ युति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या धाडसाचे, कार्याचे कौतुक होईल. लोकांच्या मनात तुमच्याबद्दल आदर वाटेल. गुप्त कारवायांचा त्रास सप्ताहाच्या शेवटी येईल. धंद्यात फायदा होईल. शेअर्समध्ये लाभ मिळेल. सल्ल्यासाठी तुम्ही भेटू शकाल. कला-क्रीडा-साहित्यात पुरस्कार व पैसा मिळेल. मोठ्या लोकांची ओळख होईल. त्यामुळे काम मिळेल. संशोधन कार्यात चांगले यश मिळेल. किचकट काम संपवा. कोर्टकेस संपवता येईल. परीक्षेत पुढे रहाल. नोकरी मिळेल. शुभ दि. ३०, १

कन्या ः– रविवारी तुम्ही ठरविलेली सर्व कामे व्यवस्थित पूर्ण होईल. नातलगांच्या भेटी होतील. धंद्यासाठी नवे काम मिळण्याचे आश्वासन मिळेल. तूळ राशीत बुध प्रवेश, चंद्र शुक्र त्रिकोण योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमची योजना पॉवरफूल ठरेल. लोकांचे सहकार्य मिळेल. वरिष्ठांबरोबर चर्चा करता येईल. प्रतिष्ठा वाढेल. कला-क्रीडा साहित्यात प्रगति होईल. मोठ्या लोकांचा परिचय झाल्याने पुढे जाण्यासाठी मार्ग मिळेल. कोर्टकेस चांगल्या पद्धतीने जिंकता येईल. संशोधन कार्यात तुमची तत्परता नावाजली जाईल. परीक्षेत उत्तम यश मिळेल. दूरच्या प्रवसाचा बेत ठरवाल. नोकरी मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. शनिवारी संयम ठेवा शुभ दि. 1, 2

तूळ ः– रविवारी मनाविरुद्ध निर्णय घ्यावा लागेल. चिडचिडेपणा होईल. दुखापत संभवते. घरात, बाहेर सावधपणे रहा. गुर्मीत राहून समस्या उग्र स्वरूप घेईल. तुमच्याच राशीत बुध प्रवेश, चंद्र, मंगळ प्रतियुति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात घाईत निर्णय घेऊ नका. वरिष्ठांचा दबाव राहील. नोकरीत योग्य तेच काम करा. आरोप येईल. धंद्यात किरकोळ समस्या येईल. वाद वाढवू नका. कला क्रीडा-साहित्यात विलंबाने यश मिळेल. जुना वाद करत राहू नका. कोर्ट केसमध्ये शांतपणे ऐकून घ्या. पुढे संधी मिळेल. योग्य सल्ला घ्या, मगच बोला, संशोधन कार्यात अडचणी येतील. रागाने काम बिघडू शकते. परीक्षेसाठी सर्व अभ्यास करा. शुभ दि. ५, ६

वृश्चिक ः– साडेसाती वृश्चिकला सुरू आहे. शेवटचे पर्व आहे. रविवारी तुमच्या पद्धतीने काम करता येईल. आनंदी रहाल. नातलगांच्या भेटी होतील. मस्तपैकी फिरावयास जाण्याचा बेत कराल. तुळेत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्ही नेटाने कार्य करा. लोकांना दुखवू नका. सप्ताहाच्या मध्यावर घरगुती कामे निघतील. स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. धंद्यात भावनेच्या आहारी जाल. नवीन ओळख असलेल्या व्यक्तीबरोबर घाईत व्यवहार करू नका. कला-क्रीडा साहित्यात प्रगती करता येईल. नोकरीत मित्रावर अवलंबून राहू नका. संशोधन कार्यातील विषय लवकर संपवा. यश सोपे नाही. शुभ दि. ३०, ४

धनु ः-रविवारी कामाचा व्याप वाढेल. मनाची द्विधा अवस्था होईल. प्रवासात अडचणी येतील. खर्च वाढेल. भेटी होतील. तूळ राशीत बुध प्रवेश, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात धावपळ होईल. लोकांच्या समस्या सोडवण्यात वेळ जाईल. पैसा खर्च होईल. प्रतिष्ठा मात्र वाढेल. धंद्यात आळस करू नका. नविन मोठे काम घ्या. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. घरात आनंदी रहाल. तरीही मनावर दडपण वाटेल. किरकोळ अडचणी येतील. कला-क्रीडा-साहित्यात चमकाल. तुम्हाला पुरस्कार मिळेल. नवे कामही मिळेल. संशोधन कार्यात यश जवळ असले तरी शोधाशोध जास्त होईल. परीक्षेसाठी तयारी चांगली करा. यश मिळेल. परदेशात जाण्याचा योग येईल. शुभ दि. २,३

मकर ः– रविवारी महत्त्वाची गाठ भेट घेता येईल. चर्चा सफल होईल. जुने मित्र भेटतील. धंद्यात वाढ होईल. तूळ राशीत बुध प्रवेश, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात वेगाने प्रगती करता येईल. मंगळवार, बुधवार रागावर ताबा ठेवा. धंद्यात सुधारणा होईल. थकबाकी मिळवा. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. कला-क्रीडा-साहित्यात चांगले मार्गदर्शन मिळेल. प्रगती होईल. नवीन ओळखी होतील. कोर्ट केसमध्ये यशाच्या जवळ जाल. यश संभव आहे. संशोधन कार्यात दिशा मिळेल. वरिष्ठांना संतुष्ट करता येईल. प्रमोशनची संधी येईल. परीक्षेत यशस्वी व्हाल. संसारात खूशखबर मिळेल. शुभ दि. ४,५

कुंभ ः– रविवारी तुमच्यावर आरोप येईल. तुमच्याबद्दल नाराजीचा सूर निघेल. राजकीय चर्चा पुढे टाका. प्रवासात सावध रहा. तूळ राशीत बुध प्रवेश, चंद्र, मंगळ प्रतियुति होत आहे. डोळ्यांची काळजी घ्या. खर्च वाढेल. धंद्यात घाई करू नका. राजकीय-सामाजिक कार्यात सर्वांनुमते निर्णय घ्या. स्वतः अडकू नका. कला-क्रीडा-साहित्यात विचारांना प्रेरणा मिळेल. प्रसिद्धीसाठी थोडे थांबावे लागेल. कायदा पाळा. वाहन जपून चालवा. कोर्ट केसमध्ये रागाचा पारा वाढू शकतो. तुमच्यावर संशय घेतला जाईल. संशोधन कार्यात विलंब होईल. दगदग होईल. भावनेच्या आहारी जाऊ नका. खरेदी करताना पाकीट सांभाळा. शुभ दि. २, ३

मीन ः– रविवार तुमच्या पद्धतीने साजरा होईल. सप्ताहातील प्रत्येक दिवस महत्त्वाचा ठरू शकतो. महत्त्वाचे काम करून घ्या. तूळ राशीत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात मोठे काम लवकरच मिळवा. थकबाकी मिळवा. संसारात किरकोळ समस्या शनिवारी येऊ शकते. प्रेमात वाद वाढवू नका. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठ तुम्हाला महत्त्वाचे काम करण्यास सांगतील. धंद्यात भावना आणू नका. कला-क्रीडा-साहित्यात प्रगतीची संधी मिळेल. नवीन ओळख होऊन तुम्ही सावधपणे बोला. कोर्ट केर्समध्ये यश मिळेल. संशोधन चांगल्या पद्धतीने करता येईल. वरिष्ठ खूश होतील. परीक्षेसाठी तयारी करा. खाण्यापिण्याची काळजी घ्या. प्रेमात फसगत होईल. शुभ दि. १, ४

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -