आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

Mumbai
Horoscope
राशी भविष्य

मेष :- अडथळे व अडचणी आल्यातरी शेवटी काम होण्याचे चिन्ह दिसेल. राग वाढू देऊ नका. वाहन हळू चालवा.

वृषभ :- दिलेला शब्द समोरची व्यक्ती पाळेल या भरवशावर राहू नका. स्वतःचे प्रयत्न महत्त्वाचे ठरतील. धंद्यात तणाव संभवतो.

मिथुन :- ‘रात गई बात गई’ हे धोरण ठेवल्यास उशिरा का होईना तुमच्या कामाला सुरुवात होईल. समजूतदारपणा ठेवावा लागेल.

कर्क :- तर्क विर्तक त्रासदायक ठरेल. स्वतःच्या चुका शोधल्यास दुसर्‍याला दोष देण्याचे कारण उरणार नाही.

सिंह :- यश मिळाल्यामुळे उत्साह वाढेल. विचारांना चालना मिळेल. कलात्मक दृष्टीकोण उपयोगी पडेल.

कन्या :- मत एकाग्र झाल्याने ताणतणाव कमी झाल्याचा अनुभव येईल. ईश्वरी आराधना उपयोगी पडेल.

तूळ :- दृढ निश्चयाने काम करता येईल. मनाप्रमाणे निर्णय घेता येईल. उत्साही वाढेल. धंदा तेजीत राहील.

वृश्चिक :- व्यवसायात फायदा होईल. मनाची चंचलता दूर करण्याचा प्रयत्न करा. खुशखबर मिळेल.

धनु :- उत्साहाला नियंत्रित ठेवा. खाण्यावर बंधन ठेवा. ईश्वरी चिंतनावर विश्वास ठेवल्यास औदासिन्य येणार नाही.

मकर :- तुमच्या विचारांची दिशा योग्य असली तरी आज मात्र तुम्हाला तडजोडीचे धोरणच यश देईल.

कुंभ :- नियोजनबद्ध काम करा. व्यवसायात लाभ होईल. वरिष्ठांच्या चुका शोधू नका. संधी सोडू नका.

मीन :- यश समोर दिसेल. प्रयत्नांचा वेग वाढवा. क्षुल्लक कारणाने निराश होऊ नका. श्री गजानन मदत करेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here