आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

Mumbai
Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- अधिकार प्राप्ती होईल. तुमचे महत्त्व इतरांच्या नरजेरत भरेल. व्यवसायात मोठी झेप घेण्याचे ठरवाल.

वृषभ :- ठरविलेला कार्यक्रम बदलावा लागेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. खिसा-पाकिट सांभाळा.

मिथुन :- प्रेमाच्या व्यक्तीचा सहवास मिळेल. नोकरीत लाभ होईल. धंदा वाढेल. शब्दांचा खेळ खेळू नका.

कर्क :- पाहुणे येतील. नविन संबंध जुळण्याचा संभव आहे. वाटाघाटीत यश मिळेल.

सिंह :- तुमचे कर्तृत्व दिसून येईल. जवळच्या व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडेल. कला क्षेत्रात नविन उपक्रम राबवता येईल.

कन्या :- उत्साहावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमची शिफारस करण्यात एखादी व्यक्ती अडथळे निर्माण करेल.

तूळ :- जीवनसाथीच्या मदतीने महत्त्वाच्या कामात यश मिळेल. धंद्यात लाभ होईल. मोठी खरेदी संभवते.

वृश्चिक :- पैशाला अनेक वाटा फुटतील. धंद्यात लक्ष द्या. क्षुल्लक चूक झाल्यास मनाला रूख रूख लागेल.

धनु :- तुळासाठी खर्च कराल. परिवाराच्या सुखासाठी नवा पर्याय शोधाल. प्रवास होईल.

मकर :- विरुद्धलिंगी व्यक्तीपासून मनस्ताप संभवतो. पाहुणे येतील. स्वतःच्या प्रगतीचा विचार कराल.

कुंभ :- अप्तेष्ठांची भेट होईल. स्वखर्चाने वरिष्ठांची बडदास्त ठेवावी लागेल. चमचमीत पदार्थ सेवनास मिळतील.

मीन :- व्यवहारात लाभ होईल. जवळचे नातलग भेटल्याचे समाधान मिळेल. कलाक्षेत्रात प्रसिद्धी मिळेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here