आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

Mumbai
Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- बिघडलेले काम सुधारण्याची संधी मिळेल. धंद्यात आळस करू नका. तुटलेले विचार जोडता येतील.

वृषभ :- वाहनाचा वेग कमी ठेवा. दुखापत होऊ शकते. कायद्याचे बंधन तोडून कोणताही निर्णय घेऊ नका.

मिथुन :- तुम्ही ठरविलेल्या कामात प्रगती होईल. अधिकाराचा वापर चांगल्या कामासाठी करा.

कर्क :- विचारांना कार्याला दिशा देणारी व्यक्ती सहवासात येईल. आप्तेष्ठांची मदत मिळेल. वाद मिटवता येईल.

सिंह :- लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका.

कन्या :- शेजारी त्रस्त करण्याची शक्यता आहे. नको असलेली व्यक्ती भेटेल. तुमचा वेळ व पैसा खर्च होईल.

तूळ :- जीवनसाथीची प्रगती झाल्याची खबर मिळेल. स्पर्धेत टक्कर देता येईल. प्रेरणादाई घटना घडेल.

वृश्चिक :- वाहनाचा कमी ठेवा. चूक झाली असेल तर ती लवकर कबूल करा. वादाला फाटे फुटतात. संकट टाळा.

धनु :- महत्त्वाचा निर्णय घेता येईल. धंद्यात फायदा होईल. आजचे काम आजच करून घ्या. मित्र भेटतील.

मकर :- तुमच्या कार्यात चांगला बदल करता येईल. धंद्यात सुधारण्यासाठी योग्य व्यक्तीचे मत विचारात घ्या.

कुंभ :- दुसर्‍याच्या कामात मदत करताना स्वतःचा खर्च होऊ शकतो. तुमच्या कार्याला सर्वांचा पाठींबा मिळेल.

मीन :- धंद्यात मोठा फायदा होईल. अरेरावी करू नका. संताप वाढवू नका. नवा परिचय उपयोगाचा असेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here