आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

Mumbai
Know your daily Horoscope
आजचे राशी भविष्य

मेष :- ठरविलेल्या नियमानुसार कार्य करू शकाल. लोकांचे, सहकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. नवीन मित्र सहवासात येईल.

वृषभ :- अहंकार व अतिशयोक्ती केल्यास वाद व तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. वाहन जपून चालवा.

मिथुन :- ठरविलेली सर्व कामे झपाट्याने पूर्ण करता येतील. आर्थिक व्यवहार मार्गी लागण्याची शक्यता आहे.

कर्क :- मिळालेली संधी सोडू नका. कामाच्या वेळेत गप्पा मारण्याची चूक केल्यास त्रास होईल.

सिंह :- वरिष्ठांशी सल्ला मसलत करता येईल. कलावंतांना चांगला प्रतिसाद मिळेल. जुने येणे वसूल करा.

कन्या :- प्रकृतीवर ताण पडेल. मित्रांच्या सांगण्यानुसार वागल्यास चूक होण्याची शक्यता आहे.

तूळ :- अपेक्षित व्यक्तीची गाठ भेट होईल. समस्या मार्गी लागण्याचे चिन्ह दिसेल. आर्थिक लाभ होईल.

वृश्चिक :- दुसर्‍याचे काम करण्यात वेळ खर्च होईल. महत्त्वाच्या कामावर लक्ष द्या. भलते धाडस टाळा. बोलण्यात व वागण्यात नम्रता ठेवा.

धनु :- मुलांच्या हितासाठी चांगला निर्णय घेऊ शकाल. जीवनसाथीसाठी खरेदी संभवते. प्रवासात आनंद मिळेल.

मकर :- सुख-समाधान शोधून काढावे लागेल. कायद्याच्या विरोधात जाऊन भलते विधान करण्याचे टाळा.

कुंभ :- व्यवसायासाठी नवा पर्याय शोधता येईल. प्रवासाचा बेत ठरवता येईल. वाटाघाटीत आशादायक परिस्थिती निर्माण होईल.

मीन :- तक्रार करण्यासारखे काहीच नाही असे वाटेल. एकटापणा दूर होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होईल.