जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

Mumbai
Know your daily Horoscope
आजचे राशी भविष्य

मेष :- उद्योगात मोठ्या लोकांची मदत घेता येईल. समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. विरोधकांना गप्प करू शकाल.

वृषभ :- सकाळी वाद होईल. दुपारनंतर कामे होण्यास सुरुवात होईल. धंद्यातील अडचण सोडवता येईल.

मिथुन :- अचानक कामाचा व्याप वाढेल. पाहुणे येतील. एखादे काम करताना चौकस बुद्धी ठेवा. चूक होईल.

कर्क :- दुसर्‍या व्यक्तीला मदत करण्यात वेळ खर्च होईल. कला क्षेत्रात तुमची चमक दिसेल. कल्पना सुचेल.

सिंह :- बुद्धिचातुर्याने तुम्ही सर्वांना चकीत कराल. कामातील तिढा सोडवता येईल. खर्च वाढेल.

कन्या :- सकाळी झालेला संताप दुपारनंतर कमी होईल. मनावरील ताण हलका होईल. प्रेमाची व्यक्ती भेटेल.

तूळ :- ठरविलेल्या कामात बदल करावा लागल्यामुळे व्याप वाढेल. वेळ जास्त खर्च होईल. थकवा वाटेल.

वृश्चिक :- अचानक विचार बदलल्यामुळे उत्साह वाटेल. कामाचा वेग वाढेल. नवे परिचय होतील. स्पर्धेत यश.

धनु :- क्षुल्लक तणाव होईल. एकटेपणा जाणवेल. धंद्यात जास्त मेहनत घ्यावी लागेल. कामात बदल होईल.

मकर :- महत्त्वाची भेट घ्या. चर्चा यशस्वी होईल. दिलेला शब्द समोरची पाळेल. थकबाकी मिळवता येईल.

कुंभ :- प्रवासात किरकोळ अडथळे येतील. नुकतीच ओळख असलेल्या व्यक्तीला मदत किती कशी करावयाचे ते ठरवा.

मीन :- फायदेशीर योजना मित्राकडून येईल. ५शखरेदी-विक्रीत लाभ मिळेल. थकबाकी वसूल करा. प्रतिष्ठा मिळेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here