आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

Mumbai
Horoscope 44
राशीभविष्य

मेष :- बुद्धिचातुर्याचा वापर करून तुम्ही कठीण काम करून घेऊ शकाल. दौर्‍यात लोकप्रियता मिळेल. धंदा वाढेल.

वृषभ :- आर्थिक अडचण दूर होऊ शकेल. कोर्टाच्या कामात यश येईल. थकबाकी वसूल करा. स्पर्धेत पुढे जाल.

मिथुन :- मैत्रीत तणाव निर्माण होईल. महत्त्वाची वस्तु वेळच्या वेळी जागेवर ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवणे कठीण होईल.

कर्क :- महत्त्वाचे काम आजच पूर्ण करा. इतरांच्यासाठी घेतलेले कष्ट सतकरणी लागतील.

सिंह :- प्रवासात नविन ओळख झाली तरी कोणताही व्यवहार करतांना विचार करा. धंद्यात फायदा होईल.

कन्या :- वाटाघाटीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. नोकरीत बदल करण्याचा विचार कराल. स्पर्धेत जिंकाल.

तूळ :- धावपळ करून सर्व कामे पूर्ण करावी लागतील. अचानक पाहुणे येतील. आवडते पदार्थ मिळतील.

वृश्चिक :- स्वतःचे कामे प्रथम पूर्ण करा. उद्यावर टाकू नका. तुमचा अंदाज बरोबर येईल.

धनु :- विचारांना चालना मिळेल. मनाची द्विधा अवस्था झाल्याने निर्णयास वेळ लागेल. पोटाची काळजी घ्या.

मकर :- आजच्या दिवसात होणारे काम करून घ्या. भेटीत यश मिळेल. कला-क्रिडा स्पर्धेत चमकाल.

कुंभ :- तुमच्याशी स्पर्धा करणारे लोक मैत्री करण्यास येतील. प्रवासात घाई करू नका. महत्त्वाची वस्तु सांभाळा.

मीन :- सरकारी कामे करून घेता येतील. सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल. आर्थिक मदत घेता येईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here