मेष :- महत्वाच्या लोकांची भेट आजच घ्या. समस्या सोडवता येईल. प्रयत्नाचा जोर वाढवा. जवळचे लोक मदत करतील.
वृषभ :- धंद्यासाठी नवा फंडा उपयोगी पडेल. थकबाकी वसूल करा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखता येईल.
मिथुन :- राजकारणात जम बसवण्याचा प्रयत्न करा. धंद्याला सांभाळून ठेवा. लोकांचे प्रेम मिळेल.
कर्क :- नको असलेली व्यक्ती भेटेल. वाहनाचा वेग कमी ठेवा. धंद्यात वादावादी होऊ शकते.
सिंह :- जीवनसाथी, मुले यांना खुष करता येईल. महत्वाची चर्चा सफल होईल. थकबाकी वसूल करा.
कन्या :- गुप्त कारवायांचा त्रास वाटेल. व्यवहारात सावध रहा योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या.
तूळ :- घरातील वातावरण आनंदी राहिल. फायदेशिर योजना व्यवसायात मिळेल. मित्र मंडळी भेटेल.
वृश्चिक :- तुमच्या कामाची पद्धत योग्य असली तरी समोरच्या व्यक्तीला त्याची कल्पना नसते. राग आवरा.
धनु :- सांगितलेले काम करणारी व्यक्ती भेटल्याने समस्या कमी होईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.
मकर :- स्पर्धेत चमकाल. मोठ्या लोकांच्या कडून आश्वासन मिळेल. नविन ओळखीचा फायदा होईल.
कुंभ :- आपुलकी दाखवणारी व्यक्ती भेटेल. धंद्यात वाढ होईल. स्पर्धेत पुरस्कार मिळेल. फायदा होईल.
मीन :- कटकटी वाढल्या आहेत असे वाटेल. नातलगांना अव्हेरून चालणार नाही. वाहन जपून चालवा.