मेष :- तुमच्या मार्गातील अडथळे दूर करण्यात यश मिळेल. जवळच्या व्यक्तीपासून लाभ संभवतो.
वृषभ :- डावपेच यशस्वी होतील. प्रयत्नाने कठीण काम पूर्ण करता येईल. खर्च वाढला तरी आवकही होईल.
मिथुन :- मनाची द्विधा अवस्था होईल. प्रेमाची व्यक्ती भेटल्याचा आनंद मिळेल. व्यवसायातील ताणतणाव कमी होईल.
कर्क :- आळस वाटेल. मन उदास राहिल. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. खर्च होईल.
सिंह :- भरवलेला कार्यक्रम वेळेत पूर्ण करता येईल. मान-सन्मान मिळेल. प्रेमात यश मिळेल.
कन्या :- वरिष्ठांची भेट घेण्यात यश मिळेल. प्रगतीची संधी मिळेल. धंद्यात लाभ होईल.
तूळ :- मनावरील दडपण कमी होईल. मोठी खरेदी संभवते. पैशाची अडचण दूर होईल.
वृश्चिक :- खाण्यापिण्याची चंगळ होईल. थकवा जाणवेल. कामाच्या वेळेत हयगय करू नका.
धनु :- कुुटुंबातील कामे करण्यात वेळ पटापट निघून जाईल. प्रेमाची व्यक्ती भेटेल. धंद्यात सुधारणा जाणवेल.
मकर :- तुमचे सुख इतरांच्या डोळ्यात येईल. वाद व तणाव होण्याची शक्यता आहे. वाहन जपून चालवा.
कुंभ :- मुलांच्या कलानुसार तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. आनंदी दिवस राहिल. खर्च वाढेल.
मीन :- घरातील वस्तूंच्या दुरुस्तीसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची वस्तू सांभाळा.