घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : मंगळवार १५ जानेवारी २०१९

आजचे भविष्य : मंगळवार १५ जानेवारी २०१९

Subscribe

मेष :- तिळगूळ घ्या गोड बोला अशा पद्धतीने विरोधकांना प्रेमाने जवळ करू शकाल. तुमच्या पद्धतीने महत्त्वाची कामे पूर्ण करा.

वृषभ:- तुमचा अंदाज चुकेल. भावनेच्या आहारी गेल्यास चुका होतील. धंद्यात लक्ष द्या. वरिष्ठांची कामे करावी लागतील.

- Advertisement -

मिथुन :- कामाचा व्याप सांभाळावा लागेल. नवीन ओळखी होतील. धंद्यातील समस्या आजच सोडवण्याचा प्रयत्न करा.

कर्क :- विरोधकांना नम्रतेने बोलून तुमच्या बाजूने वळवता येईल. खाण्यासाठी उत्तम पदार्थ मिळतील. नवीन ओळख होईल.

- Advertisement -

सिंह :- केलेल्या सर्व परिश्रमावर पाणी पडले असे वाटेल. अंदाज चुकेल. माणसांची पारख चुकली असे वाटेल.

कन्या :- घरात वाद वाढेल. प्रवासात सावध रहा. कायदा पाळा. प्रकृती अस्थिर होईल. मनावर दडपण येईल.

तूळ :- विचारांना दिशा मिळेल. कलात्मक विचारांनी उत्साह वाढेल. नवीन परिचय होईल. धंदा वाढेल. प्रेम वाढेल.

वृश्चिक :- भावनेच्या भरात कुणालाही भलतेच आश्वासन देऊन बसाल. शेजार्‍याला मदत करावी लागेल. खर्च वाढेल.

धनु :- थकबाकी वसूल करा. नोकरीत लाभ मिळेल. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. उत्साह वाढेल.

मकर :- क्षुल्लक कारणांमुळे गैरसमज होईल. गुप्त शत्रूला सामोरे जावे लागेल. वाटाघाटीचा प्रश्न निर्माण होईल.

कुंभ :- कलात्मक दृष्टीकोन सर्वांनाच समजत नाही. कुटुंबात शुभ समाचार मिळेल. कठीण काम पूर्ण करू शकाल.

मीन :- धंद्यात चांगला फायदा होईल. प्रेमाची व्यक्ती भेटेल. कला व कल्पना यांचा मेळ घालून नवीन विषयाची मांडणी साहित्य -नाट्य क्षेत्रात करू शकाल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -