घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

Subscribe

मेष :- धंद्यात वाद होऊ शकतो. तुमच्यावर एखादी व्यक्ती आरोप करेल. प्रकृतीची काळजी घ्या.

वृषभ :- सरकारी दप्तरात काम करून घेताना वरिष्ठांना कमी समजू नका. कला-क्रीडा-साहित्यात मागे राहू नका.

- Advertisement -

मिथुन :- तुम्ही ठरविलेले काम पद्धतशीरपणे पूर्ण करू शकाल. शेअर्समध्ये फायदा होईल.

कर्क :- ताणतणाव कमी करता येईल. धंद्यात सुधारणा होईल. कल्पनाशक्तीचे कौतुक होईल.

- Advertisement -

सिंह :- धंद्यात नवे काम लवकर मिळवा. जमिनीचे अर्धवट राहिलेले काम करता येईल. मदत घेता येईल.

कन्या :- मनाची द्विधा अवस्था होईल. पाहुणे येतील. तुमच्या कामाचे, कलेचे कौतुक होईल.

तूळ :- कामाचा ताण वाढेल. काम करताना चूक होऊ शकते. सावध रहा. दुखापत होऊ शकते.

वृश्चिक :- महत्त्वाचे काम करून घ्या. आळस करू नका. नवीन क्षेत्रातील लोकांची ओळख होईल.

धनु :- कोर्ट कचेरीच्या कामात प्रगती होईल. आरोप दूर करता येईल. स्वतःच्या उन्नतीचा विचार करा.

मकर :- कालचा उदासपणा दूर होईल. तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी कसा प्रयत्न करावयाचा याचा विचार करा.

कुंभ :- वाहनाचा वेग कमी ठेवा. रागाचा पारा वाढू शकतो. दुखापत संभवते. लॉटरीत पैसे मिळू शकतात.

मीन :- अडचणी कमी होतील. तुमच्या दिलदार स्वभावाचे कौतुक होईल. पदाधिकार मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -