राशिभविष्य : बुधवार, १७ जुलै २०१९

Mumbai
Horoscope 33
राशी भविष्य

मेष :- तुमचे मुद्दे प्रभावी वाटतील. डावपेच यशस्वी होतील. प्रेमाने बोलून प्रश्न सोडवा. धंद्यात लाभ होईल.
वृषभ :- अडचणी कमी होतील. वेगाने कामे पूर्ण होतील. कोर्टाच्या कामात यशस्वी व्हाल. धंद्यात वाढ होईल.
मिथुन :- धंद्यात ताण-तणाव होईल. नोकर काम सोडून जातील. प्रवासात सावध रहा.
कर्क :- घरगुती गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. खाण्याची काळजी घ्या. वाहन जपून चालवा.
सिंह :- आजच्या कामात तुम्हाला विलंब होऊ शकतो. रागावर ताबा ठेवा. विरोध नम्रपणे करा.
कन्या :- आजचे काम करून घ्या. चर्चा सफल होईल. कठीण प्रसंगावर मात करता येईल. धंदा वाढेल.
तूळ :- क्षुल्लक अडचण येईल. कामात बदल करावा लागेल. नविन ओळखीतून चांगले काम मिळवता येईल.
वृश्चिक :- प्रश्नांच्या दोन्ही बाजू समजून घ्या. म्हणजे निर्णय चुकणार नाही. घरातील गैरसमज वाढू देऊ नका.
धनु :- फायदेशीर घटना घडेल. नविन ओळख होईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. यशस्वी दिवस.
मकर :- ताण-तणाव कमी करू शकाल. तडजोड करताना नम्र रहा. तुमची प्रतिष्ठा हळू-हळू वाढेल.
कुंभ :- यंत्रणेत बिघाड होण्याची शक्यता आहे. राग वाढेल. रस्त्याने चालताना सावधगिरी बाळगा
मीन :- आजचे काम उद्यावर टाकू नका. मैत्रीतून नवे काम मिळेल. परिचयात वाढ होईल.