राशिभविष्य – सोमवार, १७ जून २०१९

Mumbai
Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. विरोध दुपारनंतर कमी होईल. तुमच्या मनाप्रमाणे काही घटना घडतील.

वृषभ :- सकाळी महत्त्वाची बोलणी करा. शत्रू मैत्री करण्याचा प्रयत्न करतील. कोर्टाच्या कामात मदत मिळेल.

मिथुन :- सकाळी तणाव व वाद होईल. घरात नाराजी दिसेल. दुपारनंतर तुमचा राग निवळेल.

कर्क :- तुमच्या हिताचा विचार करणार्‍या व्यक्तीला नाराज करू नका. सौम्य धोरण ठेवा. शत्रूला ओळखा. घाई नको.

सिंह :- तुमचा संताप दिसेल. दुपारनंतर उपाय शोधता येईल. थकबाकी वसूल करता येईल.

कन्या :- विचारांची देवाण-घेवाण चांगल्या पद्धतीने होईल. महत्त्वाचा फोन येईल. विरोधक मान देतील.

तूळ :- मनावरील ताण कमी करता येईल. वस्तु नीट ठेवा. प्रतिष्ठा वाढेल. वाहन जपून चालवा.

वृश्चिक :- तुमचा निर्णय इतरांना मान्य करावा लागेल. धंदा वाढेल. कला क्षेत्रात प्रगती होईल. कल्पना सुचेल.

धनु :- सकाळी अस्वस्थ वाटेल. कामाच्या कंटाळा येईल. दुपारनंतर विचारांना चालना मिळेल.

मकर :- आज मतभेद होतील. तुमच्यावर आरोप येईल. तुमचा निर्णय चुकीचा ठरवला जाईल.

कुंभ :- जीवनसाथीचा विचार महत्त्वाचा असेल. धंद्यात सुधारणा होईल. प्रवासात चांगली ओळख होईल.

मीन :- तुमच्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल. धंद्यात फायदा होईल. नवे घर घेण्याचे ठरवाल.