आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

Mumbai
Horoscope 44
राशीभविष्य

मेष :- मनावर एखादे दडपण राहील. जवळच्या व्यक्तीची जास्त काळजी वाटेल. खाण्या-पिण्याची काळजी घ्या.

वृषभ :- महत्त्वाचे काम आजच करून घ्या. जवळचे लोक मदत करतील. स्पर्धेत अव्वल राहता येईल.

मिथुन :- घरातील समस्या दूर करू शकाल. तुम्हाला जे पदार्थ आवडतील ते तुम्ही कराल. धंदा वाढेल.

कर्क :- कठीण परिस्थितीत सुद्धा तुमचे मन स्थिर ठेवता येईल. विरोधकांच्या कारवाया ओळखता येतील.

सिंह :- धंद्यात वाढ होईल. गिर्‍हाईकाबरोबर नम्रपणे बोला. थकबाकी वसूल करण्याचा प्रयत्न करा.

कन्या :- वरिष्ठांच्या बरोबर बोलताना मर्यादा ठेवा. त्यामुळे तुमचा प्रभाव वाढेल. नवीन मित्र मिळतील.

तूळ :- तुम्ही घेतलेला कामाचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे. भावनेच्या आहारी जाऊ नका. रस्त्याने नीट चाला.

वृश्चिक :- मुले, जीवनसाथी यांच्यासाठी वेळ द्यावा लागेल. त्यांच्या गरजा पुरवाव्या लागतील. धंद्यात सुधारणा होईल.

धनु :- उत्साहाच्या भरात माणूस कोणतेही काम पूर्ण करू शकतो. देवदर्शनासाठी जाल. नातलगांच्या सहवासात रहाल.

मकर :- गैरसमज दूर करण्याची वेळ येईल. मान-प्रतिष्ठा मिळेल. स्पर्धेत चमकाल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.

कुंभ :- मनाविरुद्ध घटना घडल्याने राग अनावर होऊ शकतो. खर्च वाढेल. धंद्यात फायदा होईल.

मीन :- घराच्या सुखासाठी धडपड कराल. साहित्याला नवा विषय मिळेल. नातलगांचा सहवास मिळेल.