राशीभविष्य मंगळवार, १९ मे २०२०

Mumbai
Know your daily Horoscope
आजचे राशी भविष्य

मेष : तुमच्या कार्याला योग्य दिशा मिळेल. धंद्यात फायदा होईल. मान-सन्मान मिळेल.

वृषभ : प्रवासात घाई करू नका. धंद्यात फसगत होऊ शकते. संसारात क्षुल्लक वाद होईल.

मिथुन : घरातील तणाव कमी होईल. वृद्ध व्यक्तीची काळजी वाटेल. समस्या सोडवता येईल.

कर्क : गुप्त कारवायांना ऊत येईल. रागावर ताबा ठेवा. प्रवासात घाई करू नका. प्रकृती सांभाळा.

सिंह : प्रश्न सोडवता येईल. चर्चा सफल होईल. जवळच्या लोकांची भेट होईल. धंदा वाढेल.

कन्या : कायद्याच्या संबंधी कामात क्षुल्लक समस्या येईल. जिद्दीने यश मिळेल. धंद्यात फायदा होईल.

तूळ : महत्त्वाच्या कामातील अडचणी दूर होतील. वाहन जपून चालवा. क्षुल्लक अपमानाचा विचार नको.

वृश्चिक : धंद्यात अंदाज बरोबर येईल. घरातील कामे करा. आळसाने कामे वाढतील.

धनु : विरोधकांना युक्तीने गप्प करता येईल. नवीन ओळख होईल. नोकरीत मर्जी सांभाळावी लागेल.

मकर : गुप्त कारवायांचा त्रास होईल. खाण्याची काळजी घ्या. वाटाघाटीत इतरांची नाराजी होऊ शकते.

कुंभ : महत्त्वाचे काम करून घ्या. उपयुक्त व्यक्तींचा फोन येईल. स्पर्धेत जिंकाल.

मीन : धंद्यात जम बसेल. फायदा वाढेल. मौल्यवान वस्तुची खरेदी कराल. घर, नोकरीत बदल होऊ शकेल.