आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

Mumbai
Horoscope
राशी भविष्य

मेष :- लोकांच्या प्रेमाच्या वर्षावाने तुम्ही धन्य व्हाल. प्रतिष्ठा मिळेल. कलाक्षेत्रात कल्पनाशक्तीला वाव मिळेल.

वृषभ :- नोकरीत कामाचा व्याप वाढेल. घरातील वृद्ध व्यक्तीची काळजी वाटेल. प्रवासात घाई करू नका.

मिथुन :- बंधु-भगिनींची भेट झाल्याने उत्साह वाढेल. स्पर्धेत प्रगती होईल. नोकरीत फायदा होईल.

कर्क :- ताण-तणाव कमी झाल्याने घरातील वातावरण ठीक होईल. धंद्यात मेहनत घ्या. काम मिळेल.

सिंह :- तुमच्या शब्दाचा मान ठेवला जाईल. नोकरीत चांगला बदल करण्याची संधी मिळेल.

कन्या :- धंद्यात मोठे काम मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. विवाहासाठी चांगली स्थळे शोधता येईल.

तूळ :- मनावरील ताण हलका होईल. नातलगांची भेट घडेल. मान-प्रतिष्ठा मिळेल.

वृश्चिक :- संयमाने कोणतीही चर्चा पूर्ण करा. अहंकार ठेऊ नका. जवळच्या व्यक्तींच्या मनाचा विचार करा.

धनु :- मनातील शंका दूर होईल. शुभ समाचार मिळेल. प्रेमाला नवे वळण मिळेल.

मकर :- तुमच्या कार्याला गती मिळेल. स्पर्धेत तुमचे कौतुक होईल. विचारांना योग्य साथ मिळेल.

कुंभ :- दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. ताण-तणाव कमी होईल. मन नव्या विचाराकडे धाव घेईल.

मीन :- तुमच्या सुखात बिब्बा घालण्याचा प्रयत्न होईल. प्रवासात घाई नको. राग वाढेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here