जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

Mumbai
Know your daily Horoscope
आजचे राशी भविष्य

मेष :- महत्त्वाच्या कामाला प्रथम पूर्ण करा. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. विविध लोकांचा सहवास उत्साह देणारा ठरेल.

वृषभ :- धंद्यात वाढ करण्याची जिद्द ठेवा. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. अपेक्षित व्यक्ती भेटल्याने चिंता मिटेल.

मिथुन :- जुना वाद मिटवता येईल. नोकरीत चांगला बदल करता येईल. शोध कार्य सुरू ठेवा.

कर्क :- नोकर माणसांना ओरडून चालणार नाही. करार करण्याची घाई करू नका. सहनशीलता ठेवावी लागेल.

सिंह :- महत्त्वाच्या कामात लक्ष द्या. आवडती व्यक्ती भेटेल. चमचमीत पदार्थ मिळतील. कठीण काम करा.

कन्या :- विरुद्धलिंगी व्यक्तीचा राग सहन करावा लागेल. मुलांच्यासाठी वेळ द्यावा लागेल.

तूळ :- अनेक कामे करून घेता येतील. वरिष्ठांच्या मर्जीनुसार निर्णय घेतल्याने तणाव होणार नाही.

वृश्चिक :- दिलेला शब्द पाळण्यासाठी वेळेला महत्त्व द्या. चमचमीत पदार्थ करण्याची तयारी करता येईल.

धनु :- कला, क्रीडा, साहित्यात मन रमेल. विचारवंतांचा सहवास लाभेल. प्रेमाला चालना मिळेल.

मकर :- कठीण प्रश्न सोडवण्यासाठी अनेकांचे सहकार्य घेता येईल. प्रतिष्ठा वाढेल. धंदा सांभाळा.

कुंभ :- नवीन विषयात रस घ्याल. स्पर्धेत जिंकाल. आवडत्या पदार्थांची गोडी चाखण्यास मिळेल.

मीन :- दुसर्‍यांच्या बोलण्याने खचून न जाता जिद्द ठेवा. प्रतिष्ठा सांभाळा. खर्च वाढेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here