आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

Mumbai
Horoscope
राशी भविष्य

मेष :- तुम्ही आनंदी रहाल. नवीन ओळखीने उत्साह वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात लोकप्रियता मिळेल.

वृषभ :- सकाळचा उदासपणा लंच नंतर कमी होईल. धंद्यात फायदा होईल. नवीन संधी तुमच्या कामात मिळेल.

मिथुन :- सकाळी महत्त्वाचे काम करून घ्या. मिळते-जुळते धोरण कुटुंबात ठेवा. खाण्याची काळजी घ्या.

कर्क :- दुपारनंतर मनावरील ताण हलका होईल. धंद्याला कलाटणी देता येईल. प्रयत्नानेच माणूस प्रगती करतो.

सिंह :- धंद्यात व्यवहार करताना चौफेर विचार करा. हिशोबात चूक संभवते. घरगुती विचार करा.

कन्या :- विचारांना दिशा मिळेल. मुले मदत करतील. थकबाकी मिळवण्याचा प्रयत्न करा.

तूळ :- घरातील कामे वाढतील. अचानक पाहुणे येतील. नोकरीसाठी प्रयत्न करा. प्रतिष्ठा मिळेल.

वृश्चिक :- तुमचे वर्चस्व सिद्ध करता येईल. आप्तेष्ठांची भेट उत्साहवर्धक ठरेल. स्पर्धेत जिंकाल.

धनु :- मोठ्या लोकांचा सहवास मिळेल. कठीण प्रश्न सोडवता येईल. थकबाकी लवकर वसूल करा.

मकर :- सकाळचा राग दुपारनंतर शांत होईल. कामे दुपारनंतर पटापट होतील. शुभवार्ता समजेल.

कुंभ :- शेजार्‍याला मदत करण्यात वेळ व पैसा खर्च होईल. प्रवासात कायद्याचे पालन करा.

मीन :- महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावता येईल. धंद्यात मदत मिळेल. शेजारी तुमचे कौतुक करतील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here