राशिभविष्य : शनिवार, २० जुलै २०१९

Mumbai
Horoscope
राशी भविष्य

मेष :- जास्त महत्त्वाचे काम करून घ्या. मित्रांची मदत घेता येईल. अचानक चांगली बातमी मिळेल.
वृषभ :- ठरविलेला कार्यक्रम नीटपणे पूर्ण करू शकाल. स्पर्धेत जिंकाल. धंद्यातील कामे वाढतील.
मिथुन :- अडचणी संपल्यामुळे वेगाने तुमची कामे करता येतील. विचारांना चालना मिळेल.
कर्क :- रागावर ताबा ठेवा. क्षुल्लक कारणाने कायदा मोडला जाऊ शकतो. रस्त्याने सावकाश चाला.
सिंह :- घरगुती कामे होतील. शेअर्सचा अंदाज चुकू नका. नविन ओळखी होतील.
कन्या :- विरोधक तुमची कामात झालेली चूक शोधून काढतील. कायद्याच्या विरोधात जाऊ नका.
तूळ :- महत्त्वाचे काम आज करून घ्या. बुद्धिचातुर्य वापरा. स्पर्धा जिंकता येईल.
वृश्चिक :- क्षुल्लक कारणाने तणाव होईल. तुम्ही नम्रपणे वागा. रागाला थारा देऊ नका. प्रश्न सुटेल.
धनु :- महत्त्वाचा निर्णय आज घेता येईल. भेटीत यश मिळेल. धंद्यात काम मिळवा.
मकर :- महत्त्वाच्या मुद्दावर चर्चा होईल. नावलौकिक वाढेल. तुमच्या प्रश्नावर सर्वच विचार करतील.
कुंभ :- दुसर्‍यांना विचारात पाडता येईल. प्रभाव वाढेल. प्रवासात चौफेर लक्ष द्या.
मीन :- मन अस्थिर होईल. निर्णय घेतांना विचार करा. घाईघाईत रस्त्याने चालू नका. शांत डोके ठेवा.