घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : मंगळवार २५ डिसेंबर २०१८

आजचे भविष्य : मंगळवार २५ डिसेंबर २०१८

Subscribe

मेष :- क्षुल्लक घटनेमुळे नाराज होण्याची गरज नाही. उत्साह कायम ठेवा. संयमाने चर्चा करा. मार्ग मिळेल.

वृषभ :- घरातील समस्या सोडवता येईल. धंद्यात वाढ करता येईल. नविन ओळख होईल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल.

- Advertisement -

मिथुन :- तुमच्या कार्याला दिशा मिळेल. जीवनसाथीची प्रगति समाधानकारक वाटेल. शुभ समाचारा मिळेल.

कर्क :- तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुठेही कायद्याच्या विरोधात जाऊन काम करू नका.

- Advertisement -

सिंह :- धावपळीमध्ये स्वतःच्या कामाकडे, प्रकृतिकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. वाहन जपून चालवा.

कन्या :- महत्वाचे काम आजच करून घ्या. खरेदी-विक्रीत फायदा होईल. प्रेमाला चालना मिळेल.

तूळ :- तुम्ही ठरविलेले काम जिद्दीने पूर्ण करू शकाल. स्पर्धेत प्रगति होईल. नोकरीचा प्रयत्न करा.

वृश्चिक :- तुमचा अंदाज बरोबर येईल. खरेदी कराल. घरातील कामे करून घ्या. भेट यशस्वी होईल.

धनु :- महत्वाची कागदपत्रे नीट सांभाळा. खर्च वाढेल. बोलतांना सावध रहा. वाहन जपून चालवा.

मकर :- जीवनसाथी, मुले यांच्या बरोबर मौज-मजेत वेळ घालवाल. दुसर्‍यासाठी आग्रह केल्यास त्याला नाकारू नका.

कुंभ :- दुसर्‍याच्या कामासाठी वेळ खर्च करावा लागेल. डोळ्यांची काळजी घ्या. दगदग होईल.

मीन :- आजचे काम आजच पूर्ण करा. राहून गेलेली भेट घेता येईल. धंदा वाढेल. संशोधनाला पाठिंबा मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -