घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

Subscribe

मेष :- आज तुम्ही महत्वाचे काम करून घ्या. घरातील कामे होतील. आनंदी रहाल. नविन ओळख होईल.

वृषभ :- रागावर नियंत्रण ठेवा. प्रवासात सावध रहा. गोड बोलून तुमचे काम करून घ्या.

- Advertisement -

मिथुन :- भेट घेण्यात यश मिळेल. जुने मित्र आर्थिक मदत मागतील. धंद्यात सावध रहा. मोठे काम मिळवता येईल.

कर्क :- वरिष्ठांची मर्जी पाहून तुम्ही तुमचे मत मांडा. धंद्यात सुधारणा करता येईल. नविन ओळख होईल.

- Advertisement -

सिंह :- महत्त्वाची राजकीय चर्चा करता येईल. तुमची प्रतिष्ठा टिकून राहिल. धंद्यात लक्ष देऊन वसूली करा.

कन्या :- विरोध मोडून काढतांना मोठ्या लोकांची नाराजी होऊ देऊ नका. उत्सावर्धक घटना घडेल. धंद्या वाढेल.

तूळ :- वेळेला महत्त्व दिल्यास जास्त कामे करता येतील. इतरांच्या कामात मदत करावी लागेल. धंदा मिळेल.

वृश्चिक :- तुमचा अंदाज चुकेल. वेळ कमी पडेल. प्रवासात सावध रहा. रागावर ताबा ठेवा. मन अस्थिर होईल.

धनु :- आजचे काम उद्यावर टाकून नका. महत्त्वाचा निर्णय घेता येईल. थकबाकी मिळवा. नवी ओळख वाढेल.

मकर :- मान-प्रतिष्ठा मिळेल. दर्जेदार लोकांचा सहवास मिळेल. तुमचे विचार महत्त्वाचे ठरतील.

कुंभ :- विचारांना चालना मिळेल. वरिष्ठांना खुष करता येईल. नवे मित्रमंडळ मिळेल.

मीन :- प्रवासात घाई करू नका. तुमचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे. पाकीट सांभाळा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -