घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

Subscribe

मेष :- कोणतेही धाडस करतांना मागचा पुढचा विचार करा. रस्त्याने चालताना चौफेर लक्ष द्या. लॉटरीचा फायदा होऊ शकतो.

वृषभ :- जीवनसाथी, मुले यांच्या समस्या सोडवता येतील. त्यांना खुष ठेवता येईल. कोर्टकेस संपवता येईल.

- Advertisement -

मिथुन :- तुमच्या मनाविरुद्ध घटना घडेल. मनस्ताप होईल. ठरविलेला कार्यक्रम बदलण्याची वेळ येईल.

कर्क :- कार्याला दिशा देता येईल. वाटाघाटीत यश मिळेल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.

- Advertisement -

सिंह :- तुम्ही घेतलेल्या निर्णयावर जवळचे लोक आक्षेप घेण्याची शक्यता आहे. वाद होईल. खोटे बोलू नका.

कन्या :- कठीण काम करून घेता येईल. वाटाघाटीत यश मिळेल. नविन ओळख फायद्याची ठरेल.

तूळ :- धंद्यात फायदा होईल. नोकरीतील कामे वाढतील. नविन ओळखीने प्रगती करण्याची संधी मिळेल.

वृश्चिक :- नव्या विषयाचा अभ्यास कराल. ठरविलेले काम पूर्ण होईल. कोर्टाच्या कामात यश मिळेल.

धनु :- मनाची द्विधा अवस्था होईल. शेजार्‍याची कामे मनात नसतांना करावे लागतील.

मकर :- आजचे काम आजच करा. मुलांच्यासाठी पैसा खर्च करावा लागेल. धंद्यात फायदा होईल.

कुंभ :- प्रेरणादाई दिवस राहिल. स्पर्धेत चमकाल. आनंदी रहाल. समस्या सोडवता येईल.

मीन :- कुटुंबातील व्यक्तीची काळजी वाटेल. वाटाघाटीत तुमचे विचार सर्वांना पटवून देता येतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -