घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

Subscribe

मेष :- अचानक खर्च निर्माण होईल. डोळ्यांची काळजी घ्या. तुमच्या मुद्यावर पुन्हा विचार करण्याचा आग्रह धरता येईल.

वृषभ :- घरगुती समस्येवर उपाय शोधता येईल. कायद्याचे पालन करा. वाहन खरेदीचा विचार कराल.

- Advertisement -

मिथुन :- प्रवासात नविनच ओळख झालेल्या व्यक्तीशी जास्त सलगी करू नका. फसगत होईल. वाद वाढेल.

कर्क :- महत्त्वाचे काम आजच करा. भेट घ्यावयाची असल्यास आजच भेटा. स्पर्धेत चमकाल. धंदा वाढेल.

- Advertisement -

सिंह :- मोठ्या व्यक्तीचा सल्ला घेता येईल. कोर्टाचे कामात अडचण येऊ शकते. प्रयत्नाने प्रश्न सोडवा.

कन्या :- कायद्याच्या चौकटीत राहून काम करा. स्पर्धेत तुमचे कौतुक होईल. नोकरीत फायदा होईल.

तूळ :- विरोधकांना गप्प करता येईल. धडाडीने एखादे अवघड काम कराल. पदाधिकार मिळेल.

वृश्चिक :- आर्थिक सहाय्य मिळवता येईल. खंबीर रहा. चिडचिडेपणा न करता काम करा.

धनु :- शेजारी तुमच्याशी तुटकपणे वागतील. आजच्या दिवसात कोणतेही काम विलंबाने होईल.

मकर :- कोर्टाच्या कामात यश मिळेल. वरिष्ठ तुमच्यावर जास्त जबाबदारीने काम देतील.

कुंभ :- प्रेमाला चालना मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नोकरीचा प्रश्न सोडवता येईल.

मीन :- मनावर एखादे दडपण असले तरी कामे करून घेता येतील. धाडसी निर्णय घ्यावा लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -