राशिभविष्य : शनिवार, २७ जुलै २०१९ 

Mumbai
Horoscope
राशी भविष्य

मेष :- आर्थिक व्यवहारात फायदा होईल. गैरसमज दूर करण्याची चांगली संधी मिळेल. ओळख वाढेल.
वृषभ :- तणाव व समस्या कमी होईल. तुम्हाला शांतपणे विचार करता येईल. प्रगतीची संधी मिळेल.
मिथुन :- अचानक कार्यक्रम बदलावा लागेल. क्षुल्लक अडचणी येतील. खर्च वाढेल. वाद करू नका.
कर्क :- महत्त्वाचे काम करून घेता येईल. तुमच्या कामात इतरांची मदत झाल्याने बरे वाटेल.
सिंह :- सर्वांच्या मतांचा विचार करता येईल. जवळच्या माणसांच्या मनातील गैरसमज दूर करू शकाल.
कन्या :- कामे पूर्ण करता येतील. भेट घेता येईल. धंद्यात वाढ होईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल.
तूळ :- उत्साह वाढेल; पण कामांचे नियोजन नीट करा. धंद्यात फायदा होईल. ओळख होईल.
वृश्चिक :- मनावरील ताण हलका होईल. वाटाघाटीत यश येईल. धंद्यात नवा पर्याय सापडेल.
धनु :- नोकरीत वाद होईल. वरिष्ठांची नाराजी होईल. प्रवासात सावध रहा. वस्तू हरवेल.
मकर :- महत्त्वाचे काम करा. चर्चा सफल होईल. कला क्षेत्रात विशेष यश मिळेल. प्रेमाला चालना मिळेल.
कुंभ :- यांत्रिक बिघाडासाठी खर्च करावा लागेल. मैत्रीत गैरसमज होईल. वाहन जपून चालवा.
मीन :- प्रगतीची नवी संधी मिळेल. थोरा-मोठ्यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल. पैसा मिळेल.