आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

Mumbai
Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. समस्या सोडवण्याचा मार्ग मिळेल. अनिष्ठा वाढेल. धंदा सुरू होईल. मित्रांची भेट होईल.

वृषभ :- धंद्यात सावध रहा. नोकरवर्गाचा त्रास होऊ शकतो. खर्च होईल. वस्तूच्या मध्ये बिघाड होण्याचा संभव आहे.

मिथुन :- मुलांचा हक्क पुरवावा लागेल. सहज फिरावयास जा म्हणजे मन उल्हासित होईल. आवडते पदार्थ खाता येतील.

कर्क :- जे आहे त्यातच समाधान मानले तर काही समस्या कमी होतील. खाण्याची काळजी घ्या. खर्च कराल.

सिंह :- मनावरील दडपण कमी होऊ शकेल. बाहेरचा तणाव घरात आणू नका म्हणजे घरात तरी आनंदी वातावरण राहील.

कन्या :- धंदा वाढेल. जवळच्या व्यक्तीचा राग दूर करता येईल. खर्च होईल. धंद्यात पैशांची गुंतवणूक होईल.

तूळ :- मनाची द्विधा अवस्था होईल. धंदा वाढेल. वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल.

वृश्चिक :- विचारांचा गुंता होईल. छोटाचा तिढा सोडवण्यासाठी जास्त विचार केल्यास उत्तर अधिक कठीण होऊ शकते.

धनु :- वेगाने पुढे जाता येईल. उत्साह व आत्मविश्वास वाढेल. प्रेमाला चालना मिळेल. विशेष यश मिळेल.

मकर :- वाद नको महत्त्वाचा प्रश्न सोडवा. यश मिळेल. गुप्त कारवायांकडे दुर्लक्ष करू नका.

कुंभ :- घरातील व्यक्तींच्या बरोबर वेळ खर्च करावा लागेल. खरेदी कराल. मौज-मजेत वेळ जाईल. मित्र भेटेल.

मीन :-प्रवासात सावध रहा. कायदा मोडल्यास दंड भरावा लागेल. अनाठाई पैसा खर्च होऊ शकतो.