घरभविष्यआजचे राशीभविष्यराशिभविष्य - शुक्रवार, २८ जून २०१९

राशिभविष्य – शुक्रवार, २८ जून २०१९

Subscribe

मेष :- फायदेशीर मुद्दे वाटाघाटीत मांडता येईल. तुमचे महत्त्व वाढेल. आत्मविश्वासाने काम कराल. धंदा वाढेल.

वृषभ :- धंद्यात सुधारणा होईल. फायदा वाढेल. नवीन ओळख होईल. तुम्ही सावधपणे मैत्री करा.

- Advertisement -

मिथुन :- तुमची प्रतिष्ठा पणाला लावूनही मनाप्रमाणे वाटाघाटी होणे कठीण आहे. धंद्यात लक्ष द्या. रागावर ताबा ठेवा.

कर्क :- आजचे काम उद्यावर टाकू नका. नव्या विचाराने प्रेरित व्हाल. तुमचे महत्त्व वाढेल. गैरकामे करू नका.

- Advertisement -

सिंह :- धंद्यात नवी प्रेरणा देणारी घटना घडेल. जुने मित्र भेटतील. वाटाघाटीची चर्चा सफल होईल.

कन्या :- जवळच्या लोकांना सांभाळून ठेवा. घरगुती प्रश्न सोडवता येईल. तुमची किंमत सर्वांना कळून येईल.

तूळ :- मनावर प्रतिष्ठेचे दडपण येऊ शकते. तुमची किंमत वाढेल. मित्राला मदत करणे जास्त महत्त्वाचे ठरेल.

वृश्चिक :- तुमच्यावर लोकांनी अधिक विश्वास ठेवावयास हवा होता असे वाटेल. प्रतिष्ठा टिकून राहील.

धनु :- घरगुती वाद होईल. प्रवासात सावध रहा. वाटाघाटीचा प्रश्न सोडवा. प्रेमाची माणसे भेटतील.

मकर :- विरोधक तुमच्या पुढे नमते धोरण घेतील. मैत्री वाढेल. धंद्यात वाढ करता येईल. प्रतिष्ठा मिळेल.

कुंभ :- किरकोळ वाद निर्माण होईल. धंद्यात फायदा होईल. मुले नाराज होण्याची शक्यता आहे.

मीन :- धंद्यात धडाडीने मेहनत घ्या. फायदा होईल. चौफेर प्रगती होईल. प्रतिष्ठा मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -