आजचे भविष्य : २८ नोव्हेंबर २०१८

Mumbai
Horoscope
राशी भविष्य

मेष :- तडजोड करावी लागल्यामुळे राग वाढू शकतो. मैत्रीत दगा फटका संभवतो. वेळेवर पोहचणे कठीण पडेल.

वृषभ :- आप्तेष्ठ तुमच्यासाठी वेळ खर्च करतील. पाहुण्याचे स्वागत करण्यात वेळ जाईल. लाभदायक भेटवस्तू मिळेल.

मिथुन :- नविन काम मिळाल्याचा आनंद होईल. कला-क्रिडा-साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. धंद्यात सुधारणा करता येईल.

कर्क :- आरोग्याची तक्रार कमी होईल. वाहनाचा वेग कमी ठेवा. विरुद्धलिंगी व्यक्तीचा सहवास मिळेल.

सिंह :- कुणालाही गृहित धरण्याची चूक करू नका. महत्वाची वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. टिका होईल.

कन्या :- वरिष्ठांच्या कामात तुम्हाला मदत करावी लागेल. त्याचा मोठा फायदा तुम्हाला मिळण्याचे वचन मिळेल.

तूळ :- जुने येणे वसुल करता येईल. मुलांची चिंता कमी होईल. नविन मोठी खरेदी होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक :- महत्वाच्या कामाची माहिती गोळा करता येईल. दर्जेदार व्यक्तीचा परिचय होईल. कामात सुसहयता येईल.

धनु :- विसरभोळपणाने एखादी वस्तू इकडे तिकडे पडण्याची शक्यता आहे. घरगुती क्षुल्लक वाद वाढवू नका.

मकर :- जीवनसाथीचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडेल. खर्च वाढेल. विरोधक नमतील असे कृत्य करता येईल.

कुंभ :- जुना वाद नव्याने उपस्थित होण्याची शक्यता आहे . एखादा फोन तुमचे स्वास्थ बिघडविण्याची शक्यता आहे.

मीन :- वरिष्ठांना राजी करण्यात तुम्हाला यश मिळेल. मोठे आवश्वासन मिळेल. आजचे काम आजच करा.