राशिभविष्य : शनिवार, ३ ऑगस्ट २०१९

Mumbai
Horoscope
राशी भविष्य

मेष :- मुलांच्या प्रगतीमुळे तुम्ही आनंदी व्हाल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. कला क्षेत्रात संधी मिळेल.
वृषभ :- किरकोळ कारणामुळे तणाव होईल. नविन ओळख होईल. धंद्यात वाढ होईल.
मिथुन :- कार्याला योग्य दिशा मिळाल्याने उत्साह वाढेल. धंद्यात काम मिळेल. कर्जाचे काम होईल.
कर्क :- वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. घरातील ताण-तणाव कमी होईल. धंदा वाढेल.
सिंह :- प्रश्न सोडवता येईल. कुणालाही कमी समजू नका. स्वतःची चूक ओळखा, पारखा मार्ग मिळेल.
कन्या :- कोणतेही काम करतांना काळजी घ्या. दुखापत होण्याची शक्यता आहे. राग आवरा.
तूळ :- योजना मार्गी लागेल. पदाधिकारचा वापर लोकांच्या उपयोगी पडेल असे काम करा.
वृश्चिक :- तुमच्या जवळची माणसे तुम्हाला मदत करतील. नोकर माणसांचा त्रास कमी होईल. धंदा वाढेल.
धनु :- किरकोळ अडचणींवर मात करता येईल. जवळच्या माणसाची चिंता वाटेल.
मकर :- भांडण जास्त वाढवू नका. तडजोड करावी लागेल. रागावर नियंत्रण ठेवा.
कुंभ :- घरगुती समस्या सोडवता येईल. धंद्यात काम वाढेल. नोकर माणसांना दुखवू नका.
मीन :- आत्मविश्वास ठेवा. समस्या सोडवता येईल. धंद्यात वाढ होईल. बुद्धि वापरा.