घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : गुरुवार ३ जानेवारी २०१९

आजचे भविष्य : गुरुवार ३ जानेवारी २०१९

Subscribe

मेष :- दौर्‍यात अडचण येऊ शकते. तुमची चूक स्पष्टपणे सांगणारी व्यक्ती समोर येईल. रागावर ताबा ठेवा.

वृषभ :- मनावरील दडपण कमी झाल्याने योग्य असा निर्णय घेता येईल. मौज-मजेत वेळ घालवाल.

- Advertisement -

मिथुन :- जे ठरवाल तेच काम होईल असे समजू नका. तडजोड करावी लागेल. बोलतांना काळजी घ्या.

कर्क :- मुलांचे सहकार्य मिळाल्यामुळे काम लवकर होईल. दूरच्या प्रवासाच्या विचार कराल. स्पर्धा जिंकाल.

- Advertisement -

सिंह :- प्रश्न समजून घेतल्यामुळेच त्यावरील उपाय शोधता येतो. दौर्‍यात खाण्याची काळजी घ्या.

कन्या :- नविन परिचयाने तुमच्या कामाला त्याचा उपयोग होऊ शकतो. वास्तु, वाहन खरेदीचा विचार कराल.

तूळ :- उत्साह वाढेल. खरेदी कराल. धंद्यात वाढ करण्याचा प्रयत्न करा. थकबाकी वसूल करता येईल.

वृश्चिक :- विचारांना योग्य दिशा मिळाल्यामुळे मनाची स्थिती चांगली राहिल. धंद्यात जम बसवा.

धनु :- कोणतेही काम करताना लागणारी वस्तु, कागदपत्र तपासून बरोबर घ्या. प्रवासात घाई करू नका.

मकर :- आजचे काम उद्यावर न टाकता आजच करा. कला क्षेत्रात तुमच्या कल्पना फारच प्रभावी ठरतील.

कुंभ :- स्पर्धेत प्रगती होईल. प्रेमाला चालना मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहिल. मौल्यवान खरेदी कराल.

मीन :- तुम्ही ठरविलेले काम वेळेत पूर्ण करता येईल. धंद्यात जम बसेल. नविन ओळखीचा फायदा होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -