आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

Mumbai
Know your daily Horoscope
आजचे राशी भविष्य

मेष :- उत्साहाच्या भरात मोठे काम करून यशस्वी व्हाल. मान मिळेल. स्पर्धेत जिंकाल. धंदा वाढेल.

वृषभ :- प्रश्न सोडवता येईल. आत्मविश्वासाने पुढे जा. वरिष्ठांची मदत मिळू शकेल. आवडणे पदार्थ मिळतील.

मिथुन :- गैरसमज दूर वेळच्या वेळी करण्याची गरज असते. सामाजिक कार्यात प्रगती होईल. धंदा सांभाळा.

कर्क :- वरिष्ठांची चिंता वाटेल. प्रवासात घाई करू नका. कायद्याच्या कचाट्यात सापडाल.

सिंह :- तणाव दूर करू शकाल. स्वतःच्या औषधाची वेळ नीट सांभाळा. मनावरील ताण हलका करता येईल.

कन्या :- शेजारी वैर करतील. प्रवासात वाहनापासून दुखापत संभवते. महत्त्वाच्या वस्तु जागेवर ठेवा.

तूळ :- मुलांच्या मदतीने कठीण समस्या सोडवता येईल. ठरविल्याप्रमाणे काम पूर्ण करता येईल.

वृश्चिक :- क्षुल्लक वाद वाढवत बसू नका. वाहनाशी खेळ करू नका. धंद्यात आळस करू नका.

धनु :- लोकांच्या उपयोगी पडल्याचे समाधान मिळेल. मान-प्रतिष्ठा वाढेल. धंद्यात सुधारणा करता येईल.

मकर :- ठरविलेले काम वेळेत पूर्ण करू शकाल. तुमच्या कलेचे कौतुक होईल. स्पर्धेत जिंकाल.

कुंभ :- विचारांना चालना मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. जुने मित्र मदतीसाठी घरी येतील.

मीन :- तुम्हाला नको असलेले काम करण्याची वेळ येईल. खर्चावर बंधन घाला. डोळ्यांची काळजी घ्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here