आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

Mumbai
Horoscope 33
राशी भविष्य

मेष :- लोकसंग्रह वाढवता येईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यवसायात फायदा होईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल.

वृषभ :- स्वतःच्या कामात तत्परता दाखवा. तुमचे वर्चस्व वाढेल. धंद्यात फायदा होईल. घरात वाद करू नका.

मिथुन :- महत्वाच्या कामात यश येईल. नातलग भेटतील. नोकरीत कामाचा व्याप सहन करूनही तुम्ही खुष रहाल.

कर्क :- अनाठाई खर्च होईल. घरात नाराजी जाणवेल. सामाजिक कार्यात हिशोब नीट करा.

सिंह :- घरातील वातावरण बदलेल. तुमच्या हिताचा विचार सर्व जण करतील. अरेरावी करू नका.

कन्या :- तुमच्या स्वभावावर टिका होऊ शकते. आत्मयिता तुम्हाला मिळणे कठीण आहे. चिडचिड होईल.

तूळ :- दिशाहिन विचार दूर सारून योग्य मार्गाने पुढे जाता येईल. धंद्यात फायदा होईल. कष्ट घ्या.

वृश्चिक :- किरकोळ वाद वाढवू नका. मान-पानाचा विचार न करता काम करावे लागेल. धंदा मिळवा.

धनु :- चांगल्या विचारांच्या माणसांची ओळख होईल. नातलग भेटतील. स्पर्धेत यश मिळेल.

मकर :- तुमच्या कामाला वेग प्राप्त होईल. योग्य करार करता येईल. मोठे लोक मदत करतील.

कुंभ :- विचारांची दिशा बदलून बोलावे लागेल. धंद्यात पुढे जालं. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.

मीन :- काम करतांना वेळ जास्त खर्च होईल. वाद होईल. तुमचा खर्च वाढू शकतो. वाहन जपून चालवा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here