राशिभविष्य : बुधवार, ७ ऑगस्ट २०१९

Mumbai
Horoscope 33
राशी भविष्य

मेष : कुटुंबातील लोकांचे सहकार्य मिळेल. वाद, तणाव कमी करता येईल. धंद्यात प्रगतीची संधी शोधा.

वृषभ : मन अस्थिर झाले तरी निर्णय घेताना विचार करा. विरोधक तुम्हाला संताप आणतील. वाहन हळू चालवा.

मिथुन : पदाधिकार मिळाल्याचे समाधान मिळेल. धंद्यात फायदा होईल. नोकरीत बदल करता येईल.

कर्क : तुमची योजना वेगाने धावणार आहे. प्रयत्न करा. प्रेमाची नाती अधिक दृढ होतील. फायदेशीर घटना घडेल.

सिंह : घरातील वाद आटोक्यात आणता येईल. अरेरावी कुठेही करू नका. तुमच्या ओळखी वाढतील.

कन्या : धंद्यात मोठा फायदा होईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. नविन ओळखीतून काम मिळेल.

तुला : मनाची द्विधा अवस्था होईल. प्रेमाची माणसे भेटतील. धंद्यात जम बसेल. घर, वाहन खरेदीचा विचार कराल.

वृश्चिक : विरोधकांना सरळ करण्यात वेळ घालवू नका. कामाला महत्त्व द्या. आळस नको. तडजोड करावी लागेल.

धनु : ताण-तणाव दूर करण्याचा प्रयत्न करा. शेजारी तुमच्याकडे मदत मागतील. वस्तुंची काळजी घ्या.

मकर : घरातील व्यक्तींची गरज ओळखून तुम्ही त्यांना खूश कराल. कला क्षेत्रात विशेष मन रमेल.

कुंभ : दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. मुलांच्या हट्टीपणापुढे तुम्हाला माघार घ्यावी लागेल.

मीन : धंद्यात फायदा होईल. आवडते पदार्थ खाताना पोटाची काळजी घ्या. प्रेमात वाद वाढवू नका.