जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

Mumbai
Horoscope 44
राशीभविष्य

मेष :- महत्त्वाचे काम सकाळी करून घ्या. दुपारनंतर बोलण्यातून गैरसमज होऊ शकतो. प्रवासात काळजी घ्या.

वृषभ :- कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल. जुने स्नेही भेटतील. गप्पा गोष्टीत वेळ मजेत जाईल.

मिथुन :- वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. धंद्यात वाढ करता येईल. स्पर्धेत जिंकाल.

कर्क :- सकाळी कामात अडचणी येतील. दुपारनंतर मार्ग मोकळा होईल. घरातील ताण कमी होईल.

सिंह :- प्रवासात घाई गर्दीत सावधपणे चाला. प्रकृतीवर ताण पडेल. जीवनसाथी नाराज होऊ शकते.

कन्या :- दुपारनंतर तुमचा उत्साह वाढेल. प्रकृतीत सुधारणा होईल. धंद्यात योग्य अंदाज घेऊ शकाल.

तूळ :- संमिक्ष स्वरूपाच्या घटना घडतील. रस्त्याने चालतांना दुखापत संभवते. हिशोब नीट करा.

वृश्चिक :- शेअर्सचा अंदाज घेता येईल. मन स्थिर ठेवता येईल. नव्या ओळखी होतील. स्पर्धा जिंकाल.

धनु :- नव्या विचाराने तुमचा उत्साह वाढेल. सर्वांची मदत उपयोगी पडेल. स्पर्धेत कौतुक होईल.

मकर :- ठरविलेले काम वेळेत पूर्ण करता येईल. कर्जांचे काम मार्गी लागेल. प्रेमाला चालना मिळेल.

कुंभ :- धंद्यात नवा बदल करू शकाल. नविन ओळख वाढेल. तुमच्या कामाचा उत्तम मोबदला मिळेल.

मीन :- सकाळी अडचणी आल्या तरी, दुपारनंतर सर्व कामे सुरळीत पूर्ण करता येतील. विचारांना दिशा मिळेल.