जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

Mumbai
Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- धंद्यात मेहनतीचा उत्तम मोबदला मिळेल. सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. आर्थिक सहाय्य घेता येईल.

वृषभ :- दिवसाच्या दुसर्‍या प्रहरात तुमच्या कामांना गती मिळेल. प्रवासात घाई करून उपयोग होणार नाही.

मिथुन :- सकाळी लवकर महत्त्वाची कामे करून घ्या. धंद्यात जम बसेल. मागिल येणे वसूल करा.

कर्क :- तुमच्या कार्याला दिशा देता येईल. तुमचे मुद्दे प्रेमाने व संयमानेच सर्वांना पटवून द्या. कायदा पाळा.

सिंह :- आनंदी रहाल. प्रकृतीत सुधारणा होईल. घरगुती समस्या सोडवताना स्वतःच्या चुका सुद्धा विचारात घ्या.

कन्या :- दुपारनंतर सकाळचा वाद निपटण्याचा प्रयत्न करता येईल. घरातील व्यक्ती तुमच्या बरोबर मदतीसाठी येतील.

तूळ :- सकाळी कामे करून घ्या. वाहन जपून चालवा. संध्याकाळी मनावर दडपण येईल. खर्च वाढेल.

वृश्चिक :- दुपारनंतर तुमचा उत्साह वाढेल. शांत डोक्याने प्रश्न सोडवा. दुसर्‍याला कमी लेखू नका.

धनु :- नवीन ओळखीचा उपयोग करून घेता येईल. संध्याकाळी तुमचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे.

मकर :- प्रयत्नाने कोणताही प्रश्न सोडवता येतो. जिद्द ठेवा. रागाने स्वतःचेच नुकसान होण्याची शक्यता असते.

कुंभ :- धंद्यातील चुका शोधून काढता येतील. कला-क्रीडा-साहित्यात मोठ्या लोकांची ओळख होईल.

मीन :- तुमच्या भावनांची कदर केली जाईल. धंद्यातील वाद मिटेल. मोठे काम मिळवता येईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here