आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

Mumbai
Horoscope
राशी भविष्य

मेष :- तुमचे मत मांडल्यानंतर तुम्ही तटस्थ रहा. कुणावरही दबाव टाकू नका. मन चंचल होईल. राग येईल.

वृषभ :- संसारातील ताण तणाव कमी होईल. जीवनसाथीला खुष ठेवता येईल. नविन घर, वाहन खरेदीचा विचार कराल.

मिथुन :- महत्त्वाचा माणसाला भेटता येईल. जुने मित्र तुमच्याकडे कामासाठी येतील. स्पर्धेत टिकून रहा.

कर्क :- तुमच्या बद्दल झालेला गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. धंद्यात मेहनतीचे चांगले फळ मिळेल.

सिंह :- प्रवासात धावपळ होईल. नको असलेली व्यक्ती तुमचा वेळ घेईल. खर्च वाढेल. वस्तु सांभाळा.

कन्या :- घरगुती कामे करता येतील. तुम्ही ज्याच्या शोधात होतात ते सापडेल. कला-क्रिडा क्षेत्रात प्रगती होईल.

तूळ :- मनावर ताण राहिल. कोणतेही काम करतांना त्याकडे नीट लक्ष द्या. दुखापत होऊ शकते.

वृश्चिक :- लोकांच्या कडून तुमच्या अपेक्षा वाढतील. कल्पना कृतित उतरवता येईल. आनंदी रहाल.

धनु :- किरकोळ अडचण दूर करू शकाल. आत्मविश्वासाने एखादा खंबीर निर्णय तुम्ही घेऊ शकाल.

मकर :- महत्त्वाची चर्चा सफल होईल. तुमची प्रतिष्ठा वाढेल. विरोधक नमते धोरण घेतील. धंदा वाढवा.

कुंभ :- घरातील कामे झाल्याने दडपण कमी होईल. नविन वाहन घेण्याचा विचार कराल. पाहुणे येतील.

मीन :- धंद्यात वाढ होईल. फायदा वाढेल. पाठपुुरावा केल्यास कठीण काम करून घेता येईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here