जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

Mumbai
Know your daily Horoscope
आजचे राशी भविष्य

मेष :- तुमचा प्रभाव वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. ताण कमी होईल. अपेक्षित माणसे भेटतील.

वृषभ :- तुमच्या कठीण कामात कुणाची तरी मदत घेता येईल. धंद्यात जम बसेल. येणे वसूल करा.

मिथुन :- वाद वाढण्याची शक्यता आहे. तुमचा तिरस्कार करण्याचा प्रयत्न होईल. वाहनापासून त्रास होऊ शकतो.

कर्क :- महत्त्वाचे काम करून घेण्यात यश मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात मदत मिळेल.

सिंह :- जुने मित्र भेटतील. मौज-मजेत वेळ घालवण्याचे ठरवाल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील.

कन्या :- घरातील कामे करून घेता येईल. नवीन काम मिळवता येईल. प्रेमाला चालना मिळेल.

तूळ :- कामाचा व्याप वाढेल. कला क्षेत्रात मन रमेल. उदास वाटेल. खरेदी करताना सावध रहा.

वृश्चिक :- तुमचा उत्साह वाढेल. नव्या कामाचा विचार कराल. प्रकृतीत सुधारणा होईल. जुने स्नेही भेटतील.

धनु :- एकटेपणा जाणवेल. तुमच्या विचारांचा दुसर्‍यांना उपयोग करून घेता येईल. वाद होऊ शकतो.

मकर :- राहून गेलेले काम आजच पूर्ण करा. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. तुमच्या कार्याचे कौतुक होईल.

कुंभ :- क्षुल्लक अडचणींवर मात करून तुमचे काम करून घेता येईल. भावनेच्या माध्यमातून विचार कराल.

मीन :- तुमचा जम धंद्यात बसवता येईल. पाहुणे येतील. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. उत्साह वाढेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here