आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

Mumbai
Horoscope
राशी भविष्य

मेष :- प्रकृतिची काळजी घ्या. रागाचा पारा वाढू शकतो. धंद्यात थकबाकी मिळवतांना कटकट होऊ शकते.

वृषभ :- महत्वाच्या कामाची जबाबदारी घ्यावी लागेल. थकबाकी मिळवण्याचा प्रयत्न करा. समस्या सोडवा.

मिथुन :- अपेक्षित व्यक्तीची भेट घेता येईल. तुमच्या कामात मदत होऊ शकेल. प्रेमात यश मिळेल.

कर्क :- बोलण्यातूनच वैर निर्माण होत असते. संयमाने वागल्यास कठीण काम करून घेता येईल.

सिंह :- कामाचा व्याप वाढल्याने थकवा वाढेल. वैर वाढू देऊ नका. जुने येणे वसूल करा. स्पर्धा कठीण आहे.

कन्या :- जवळच्या माणसांना मदत करावी लागेल. खाण्याची चंगळ होईल. स्पष्ट बोलणे जपून करा.

तूळ :- घरात किरकोळ वाढ संभवतो. प्रवासात तडजोड करावी लागेल. धंद्यात गोड बोलून रहा.

वृश्चिक :- आजचे काम उद्यावर टाकू नका. धंद्यात सुधारणा करता येईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.

धनु :- तुमचा प्रभाव वाढवता येईल. लोकप्रियता मिळेल. धंद्यात जम बसवा. मोठ्या लोकांचा परिचय होईल.

मकर :- महत्वाच्या प्रश्नावर चर्चा करता येईल. स्पर्धेत जिंकाल. घरातील कामांचा आळस करू नका.

कुंभ :- व्यवसायात सुधारणा होऊ शकेल. प्रतिष्ठा मिळवण्यासाठी धडपड करावी लागेल. नातलग भेटतील.

मीन :- तणाव कमी करून नवे काम मेहनतीने करता येईल. इतरांच्यासाठी धावपळ करावी लागेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here