घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : बुधवार, १२ फेब्रुवारी २०२०

राशीभविष्य : बुधवार, १२ फेब्रुवारी २०२०

Subscribe

मेष :- विरोधक कट करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही विरोध व विरोधक ओळखून ठेवा. उत्तर सावधपणे घ्या. प्रतिष्ठा राहील.

वृषभ :- महत्त्वाच्या कामात यश मिळेल. केस जिंकता येऊ शकते. बोलणे थोडे सौम्य ठेवा. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा.

- Advertisement -

मिथुन :- प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. ओळखी होतील. संसारासाठी चांगली खरेदी कराल. सौम्यपणे बोला.

कर्क :- नोकरीत तुमचा प्रभाव वाढेल. इतरांची चूक सुधारावी लागेल. कला क्षेत्रात कल्पनाशक्तीला चालना मिळेल.

- Advertisement -

सिंह :- मान-प्रतिष्ठा मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. धंद्यात मोठेे काम मिळेल. कठीण प्रश्न सोडवा.

कन्या :- वाहन हळू, नीट चालवा. घरासंबंधी समस्या सोडवावी लागेल. वृद्ध व्यक्तीची चिंता राहील. हिशोब नीट करा.

तूळ :- कामाची गर्दी होईल. पाहुणे येतील. खाण्याची चंगळ त्रासदायक ठरू शकते. अंदाज विचारपूर्वक घ्या.

वृश्चिक :- महत्त्वाची कामे होतील. कल्पनाशक्तीचे कौतुक होईल. धंद्यात काम मिळेल. वसुली करा.

धनु :- अडचणीत आलेले काम करून घ्या. प्रेमाला चालना मिळेल. धंद्यात चांगली सुधारणा होईल. मैत्री कराल.

मकर :- मान-प्रतिष्ठा मिळणारी घटना घडेल. नोकरी मिळेल. रागावर ताबा ठेवा. तुमची कामे होतील.

कुंभ :- तुम्ही घेतलेला निर्णय योग्य असला तरी त्यावर टीका होऊ शकते. क्षुल्लक कारणाने थकवा वाटेल.

मीन :- ठरविलेले काम पूर्ण करा. घरातील वृद्ध माणसांची काळजी घ्यावी लागेल. धंद्यात वाद वाढवू नका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -