घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : मंगळवार, ११ फ्रेबुवारी २०२०

राशीभविष्य : मंगळवार, ११ फ्रेबुवारी २०२०

Subscribe

मेष : तुमचा प्रभाव तुमच्या क्षेत्रात वाढेल. विरोध मोडून काढता येईल. स्पर्धा जिंकाल. घरातील कठीण कामे होतील.

वृषभ : कठोर शब्द बोलण्याचे टाळा. नोकरीत प्रभाव पडेल. घरातील तणाव मिटवता येईल. वाटाघाटीत यश मिळेल.

- Advertisement -

मिथुन : चौफेर यशाची वाटचाल होईल. नोकरीत वर्चस्व राहिल. धंद्यात जम बसेल. अंदाज बरोबर येईल.

कर्क : धंद्यात मोठे काम मिळवण्याचा प्रयत्न करा. वाद वाढवू नका. आळस करू नका. नोकरांना टिकवून ठेवा.

- Advertisement -

सिंह : घरातील समस्या सोडवता येईल. धंद्यात फायदा वाढेल. मौल्यवान खरेदी कराल. नोकरीत कौतुक होईल.

कन्या : धावपळ कराल. प्रवासात घाई नको. स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. व्यसनाने नुकसान.

तूळ : अनाठाई खर्च टाळा. पाहुणे येतील. धंद्यात वाढ होईल. आवडते पदार्थ मिळतील. कठीण प्रश्न आज सोडवा.

वृश्चिक : महत्वाचा निर्णय घ्याल. कामे करा. धंदा वाढेल. नवीन ओळखी होतील. वसूली करा.

धनु : तुमचा प्रभाव नव्याने वाढेल. स्पर्धा जिंकाल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. मैत्री होईल.

मकर : प्रवासात घाई करू नका. चांगला सल्ला विचारात घ्या. त्याचा अव्हेर करू नका. राग कमी करा.

कुंभ : महत्वाचे काम होईल. नावलौकीकात भर पडेल. जमीन, घर संबंधी प्रश्न सोडवा. लाभ होईल.

मीन : नोकरीत काम वाढेल. कामात चूक होऊ शकते. चर्चा वादाकडे वळेल. सावध रहा. मोह आवरा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -