मेष : मनाचे स्थैर्य राहिल. जवळचे लोक मदत करतील. नोकरीत कामाचा व्याप वाढला तरी तुम्ही यश मिळवाल.
वृषभ : महत्त्वाचे काम करून घ्या. नोकरीत वरिष्ठांना खुष करता येईल. धंद्यात फायदा होईल. वाद करू नका.
मिथुन : नोकरीत कामामध्ये सावध रहा. चूक होऊ शकते. बोलण्यातून गैरसमज होऊ शकतो. पोटाची काळजी घ्या.
कर्क : आज ठरविलेले काम उद्यासाठी बाकी ठेऊ नका. वरिष्ठांना खुष करू शकाल. धंद्यात तडजोड करा.
सिंह : नोकरीमध्ये समस्येवर चर्चा करताना सावधपणे बोला. नवीन ओळखी होतील. कलेत प्रगती होईल.
कन्या : धंद्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल.
तूळ : तुम्हाला कामाचा व्याप वाढेल. रागाचा पारा वाढू देऊ नका. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. धंदा वाढेल.
वृश्चिक : घरात शुभ घटना घडेल. वादविवादात सरशी होईल. आज ठरविलेले काम उद्यावर टाकू नका.
धनु : तुमचा अवमान करण्याचा प्रयत्न नोकरीत होईल. राजकीय-सामाजिक कार्यात अडचणी येईल.
मकर : महत्त्वाचे काम आज करून घ्या. आळस करू नका. जमिन, घर या संबंधी समस्या सोडवा.
कुंभ : क्षुल्लक कारणाने मन उदास होईल. धंद्यात नवे काम मिळेल. दुसर्याला मदत करावी लागेल.
मीन : राजकीय-सामाजिक कार्यात पद मिळेल. धंद्यात जम बसवा. वाहन जपून चालवा.