राशीभविष्य : सोमवार, १७ फेब्रुवारी २०२०

Mumbai
Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : संसारात कामे वाढतील. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. धंद्यात धावपळ होईल. रागावर ताबा ठेवा.

वृषभ : नोकरीमधील तणाव कमी करता येईल. महत्वाचे काम आज करून घ्या. धंदा मिळेल. वसुली करा.

मिथुन : विरोधक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. तुमची जिद्द महत्वाची ठरेल. प्रवासात घाई करू नका.

कर्क : आज ठरविलेले काम उद्यावर टाकू नका. नोकरीत अचानक कामात बदल होऊ शकतो.

सिंह : किरकोळ कारणाने आपसांत नाराजी होऊ शकते. गैरसमज होईल. आपसांत नाराजी होऊ शकते.

कन्या : गोड बोलून धंद्यात वाढ करता येईल. आत्मविश्वास वाढेल. थकबाकी वसूल करता येईल.

तूळ : धंद्यात काम मिळवा. वर्चस्व नोकरीत राहिल. मित्राला मदत करावी लागेल. कला क्षेत्रात मन रमेल.

वृश्चिक : नवीन ओळखी होतील. धंद्यात जास्त धावपळ होऊ शकते. लोकांच्या मनातील गैरसमज दूर करा.

धनु : रागावर ताबा ठेवा. वादविवादात पटकन वेगळेवळण लागण्याची शक्यता आहे. ओळखी वाढतील.

मकर : तुमच्याकडे कामा करीत मोठी व्यक्ती येईल. कोर्टकेस यशस्वी कराल. धंद्यात वाढ करता येईल.

कुंभ : मोठ्या लोकांची ओळख होईल. सहवास मिळेल. प्रतिष्ठा मिळेल. लाभवस्तु मिळेल. खरेदी कराल.

मीन : कामाचा व्याप सांभाळावा लागेल. नवीन मित्रमंडळ तयार होईल. मौज-मजा करण्यात वेळ जाईल.