राशीभविष्य : मंगळवार, २१ जानेवारी २०२०

Mumbai
Know your daily Horoscope
आजचे राशी भविष्य

मेष : औषधांची वेळ सांभाळा. धाडस अनाठाई करू नका. दुखापत होईल. वाहन जपून चालवा. प्रतिष्ठा राहिल.

वृषभ : घरातील लोकांना खुष करता येईल. घरासंंबंधी कामे करून घ्या. नोकरीत वरिष्ठांना खुष करता येईल.

मिथुन : वरिष्ठांच्या मर्जीने वागावे लागेल. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. विरोधक कारस्थाने करतील.

कर्क : महत्वाचे काम आजच करून घ्या. घरगुती कामे करून घ्या. पाहुणे येतील. धंद्यात नवे काम मिळवा.

सिंह : विरोधक राजकारणात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. वरिष्ठांचा अवमान होईल असे वाक्य टाळा.

कन्या : नोकरीत प्रभाव पडेल. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. धंद्यात वाढ होईल. वस्तु नीट ठेवा.

तूळ : धंद्यात हिशोब नीट करा. आप्तेष्ठ, मित्र भेटतील. नोकरीत कोणलाही कमी लेखू नका. खरेदी कराल.

वृश्चिक : तणाव कमी होईल. तुमच्या कामांना गती मिळेल. मान-प्रतिष्ठा मिळेल. धंद्यात मोठी वाढ होईल.

धनु : दुखापत टाळा. मनाची द्विधा अवस्था होईल. आवडते पदार्थ मिळतील. ओळखी वाढतील.

मकर : स्पर्धा जिंकाल. कला क्षेत्रात मन रमेल. फायदा होईल. धंदा वाढवा. थकबाकी वसूल करा.

कुंभ : कोर्टाच्या कामात सहाय्य मिळेल. वरिष्ठांचा सल्ला घ्या म्हणजे काम करतांना नोकरीत अडचण येणार नाही.

मीन : धंद्यात नवे काम मिळवा. घरगुती कामे करण्यात चूक करू नका. पोटाची काळजी घेता येईल. प्रतिष्ठा मिळेल.