घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : २५ सप्टेंबर

आजचे भविष्य : २५ सप्टेंबर

Subscribe

मेष- उतावळेपण धोकादायक ठरेल. बोलण्या वागण्यात काळजी घ्या. वाहन जपून चालवा. खर्च वाढेल.

वृषभ- कष्टाशिवाय यश नाही असे वाटेल. जीवनविचार मनात येतील. धंदा वाढेल.

- Advertisement -

मिथुन- महत्वाचा निर्णय घेता येईल. व्यवहारांची चर्चा करता येईल. प्रेमाच्या व्यक्तीचा सहवास मिळेल.

कर्क- स्पर्धा आकर्षक होईल. प्रतिष्ठा मिळेल. आर्थिक लाभ होईल. प्रयत्न करण्याचा फायदा होईल.

- Advertisement -

सिंह- तणावाचा परिणाम शरीरावर होईल. डोळ्यांची काळजी वाटेल. तोडून बोलू नका.

कन्या- जागेच्या व्यवहाराची बोलणी करता येतील. वाहन जपून चालवा. कुटुंबासाठी खर्च करावा लागेल.

तूळ- शेजार्‍याला मदत करावी लागेल. तुमचे विचार इतरांना पटवून देत बसू नका.

वृश्चिक- परिस्थितीचा अभ्यास करता येईल. नवीन गोष्टी शोधून काढता येतील. विचारांना चालना मिळेल.

धनु- तत्वाने वागण्याचा फार आग्रह धरू नका. प्रतिष्ठा मिळेल. जुना मित्र भेटेल. कष्ट करावे लागतील.

मकर- वेगवान कामाचा दिवस राहिल. मित्र-परिवार भेटेल. तुमच्या मताशी इतर सहमत होतील.

कुंभ- व्यवसायात लाभ होईल. महत्वाची चर्चा करता येईल. वेळ फुकट घालवू नका.

मीन- जास्त विचार करण्यापेक्षा आहे त्या कामात लक्ष केंद्रीत करा. धंदा वाढेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -