राशीभविष्य : गुरुवार, २८ मे २०२०

Mumbai
Horoscope 44
राशीभविष्य

मेष : अडचणीतून मार्ग शोधावा लागेल. तुमच्या बरोबरचे लोक मदत करतील. धंद्यात दुर्लक्ष करू नका.

वृषभ : कठीण कामे लवकर पूर्ण करा. घरातील माणसांना समजून घ्या. धंद्यासाठी संधी मिळेल.

मिथुन : नव्या विचाराने प्रेरित व्हाल. अहंमपणा सोडल्यास मोठे यश मिळवता येईल. धंद्यात जम बसेल.

कर्क : गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. ती सोडू नका. जुने स्नेही भेटतील.

सिंह : रस्त्याने चालताना वेंधळेपणा करू नका. महत्त्वाची कागदपत्रे वेळच्यावेळी जागेवर ठेवा.

कन्या : संसारातील समस्या सोडवाल. तुमच्या कामाचे वरिष्ठ कौतुक करतील. धंदा मिळेल.

तूळ : काम करताना क्षुल्लक चूक सुद्धा करू नका. प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात वस्तू सांभाळा.

वृश्चिक : आजचे काम आजच करा. दुसर्याला मदत करावी लागेल. धंद्यात सामोपचाराने वागा.

धनु : क्षुल्लक वाद अधिकार वर्गाबरोबर होऊ शकतो. प्रवासात कायदा मोडू नका. प्रेरणा मिळेल.

मकर : मदत केलेल्या व्यक्ती तुम्हाला प्रगतीचा नवा मार्ग दाखवतील. कला क्षेत्रात मन रमेल.

कुंभ : धंद्याला कलाटणी मिळेल. थकबाकी वसूल करा. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. खरेदी कराल.

मीन : आर्थिक व्यवहार करताना गोंधळ करू नका. वाहनापासून धोका संभवतो. स्थिर मन ठेवा.