Friday, August 7, 2020
Mumbai
29.8 C
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य २ डिसेंबर  २०१९

राशीभविष्य २ डिसेंबर  २०१९

Mumbai
Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : तुमच्या कार्याला योग्य दिशा देण्याचा मानस पूर्ण होईल. धंद्यात वाढ होईल. नम्रपणाने तुमचे विचार मांडा.

वृषभ : महत्त्वाचे काम करण्यात यश मिळेल. वरिष्ठ मदत करतील. नोकर माणसे मिळतील. व्यसन करू नका.

मिथुन ः क्षुल्लक कारणावरून तुम्हाला त्रास देण्याचा प्रकार  नोकरीत घडेल. वरिष्ठांचे कान भरले जातील. नम्र रहा.

कर्क :  महत्त्वाचे काम आजच करून घ्या. घरातील लोकांना तुमचा विचार पटवून द्यावा लागेल. महत्त्वाकांक्षा ठेवाल.

सिंह : आरोप येईल. जवळचे लोक तुम्हाला कमकुवत ठरवतील. कोर्टाच्या कामात अडचण येऊ शकते.

कन्या ः ठरविलेला कार्यक्रम वेळेत पूर्ण होईल. अपेक्षित व्यक्तीची मदत मिळेल. आवडते पदार्थ मिळतील.

तूळ : कामांची गर्दी होईल. सावधपणे कामे करा. छोटीसी दुखापत होऊ शकते. धंद्यात फायदा होईल.

वृश्चिक : तुमचा नावलौकिक वाढेल. नवीन ओळखी कला क्षेत्रात होतील. कल्पनाशक्ती वाढेल.

धनु : धंद्यात मोठे काम मिळेल. वरिष्ठांची मदत घेता येणार नाही. मैत्री वाढेल. प्रेमाला चालना मिळेल.

मकर : अपेक्षित यश मिळवावे लागेल. घरातील व्यक्तींना दुखवू नका. अनाठाई खर्च टाळा. व्यसन नको.

कुंभ : धंद्यात सुधारणा होईल. मोठे काम मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. मागील येणे वसूल करा.

मीन : आजच्या कामात चांगले यश मिळेल. प्रवासात घाई नको. धंद्यात वाढ होईल. कलेत प्रगती कराल.