राशीभविष्य शुक्रवार २४ जानेवारी २०२०

Mumbai
Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : अडचणी कमी होतील. कठीण कामात प्रयत्नांने यश मिळवता येईल. नोकरीत वरिष्ठ तुम्हाला महत्त्वाचे काम करावयास सांगतील.

वृषभ : धंद्यात वाढ होईल. घरगुती वातावरण आनंदी राहील. प्रवासात आनंद मिळेल. स्पर्धा आकर्षक ठरेल.

मिथुन ः संताप वाढेल. संयमाने प्रत्येक कृती करा. रस्त्याने सावधपणे चाला. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे.

कर्क : धंद्यात वाढ होईल. जीवनसाथीच्या मर्जीनुसार वागावे लागेल. स्पर्धा सरस होईल. प्रसिद्धी मिळेल.

सिंह : मनावर दडपण येईल. विरोध सहन करून काम करावे लागेल. ध्येयावर लक्ष ठेवावे. कायदा मोडू नये.

कन्या ः उत्साह वाढेल. संततीच्या प्रगतीने खूश व्हालच. नोकरीत वरिष्ठ कौतुक करतील. धंद्यात लाभ होईल.

तूळ ः महत्त्वाच्या कामाकडे लक्ष द्या. मन उदास होईल. जास्त कष्ट पडण्याची शक्यता आहे.

वृश्चिक ः प्रवासात वेळ जाईल. ठरविलेले काम वेळेत पूर्ण करू शकाल. शेअर्समध्ये अंदाज बरोबर येईल.

धनु ः- आत्मविश्वासाने कठीण काम पूर्ण करू शकाल. प्रेमाची व्यक्ती भेटेल. कल्पनाशक्तीला वाव मिळेल.

मकर ः- धाडसी वृत्तीचे दर्शन होईल. प्रेमात क्षुल्लक वाद होईल. धंद्यात लक्ष द्या. मान-सन्मानाचा योग येईल.

कुंभ ः- मन उदास होईल. तणावामुळे डोके दुखेल. जवळच्या व्यक्तीची काळजी वाटेल. खर्च वाढेल.

मीन ः- अपेक्षित व्यक्ती भेटल्यामुळे कठीण कामातील अडचणी कमी होतील. धंद्यात नफा वाढेल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल.