राशीभविष्य शनिवार 14 मार्च 2020

Mumbai
Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : धावपळ वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. राजकीय क्षेत्रात तुम्हाला कमी लेखण्याचा निष्फळ प्रयत्न केला जाईल. शांत रहा.

वृषभ : घरातील तणाव कमी करता येईल. मानसिक शांतता लाभेल. धंद्यात खर्च होईल. महत्त्वाच्या वस्तू वेळच्या वेळी जागेवर ठेवा.

मिथुन ः प्रवासात घाई करू नका. धंद्यात संयमाने वागा. नवीन विषयाचा अभ्यास कराल. विरोध सहन करावा लागेल.

कर्क : घरातील व्यक्तीची मदत मिळेल. लोकांच्या मनातील गैरसमज दूर करता येईल. नोकरीचा प्रयत्न करा. वसुली करा.

सिंह : तुमच्यावर निष्कारण आरोप होईल. टिकात्मक चर्चा होईल. धावपळ होईल. वरिष्ठ व्यक्तीचा सल्ला मानावा लागेल.

कन्या ः धंद्यात नरमाईने वागा. बोला. काम होईल. पोटाची काळजी घ्या. आप्तेष्ठांना मदत करावी लागेल. कमी बोला.

तूळ ः धंद्यात वाढ होईल. तुमच्या कार्याशी स्पर्धा करणारे लोक वाढतील. नवीन ओळख होईल. पाहुणे येतील.

वृश्चिक ः तुमच्या कार्याला योग्य दिशा मिळेल. शेजारी मदत मागण्यास येईल. महत्त्वाची वस्तू वेळच्या वेळी जागेवर ठेवा. धंदा मिळेल.

धनु ः– काम रेंगाळण्याची शक्यता आहे. धंद्यात वाढ करण्याचा प्रयत्न करा. मुलांच्यासाठी वेळ द्यावा लागेल. पाहुणे येतील.

मकर ः– सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. लोकांच्यासाठी महत्त्वाची कामे करता येतील. धंद्यात आळस करू नका. वसुली करा.

कुंभ ः– नोकरीसाठी नवा प्रयत्न करा. ओळखी वाढतील. स्पर्धेत चमकाल. धंद्यात सुधारणा करण्याचा विचार करा.

मीन ः– रेंगाळत राहिलेले काम करून घेता येईल. वसुली करा. नवीन ओळखीमुळे उत्साह वाढेल. कल्पनाशक्ती वाढेल.