मेष : राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्व वाढेल. डावपेच यशस्वी होईल. लोकप्रियता मिळेल. धंद्यात वाढ होईल.
वृषभ : अरेरावी करू नका. नवीन ओळखीवर जास्त विश्वास ठेऊ नका. प्रवासात घाई नको. दुखापत संभवते.
मिथुन ः तुमचा उत्साह ओसंडून वाहिल. थट्टा-मस्करी करतांना प्रसंगान्वे, व्यक्तीचे भान ठेवा. ओळखी होतील.
कर्क : घरातील तणाव कमी करता येईल. खाण्याची चंगळ कराल. मान-अपमान यांचा विचार न करता काम करा.
सिंह : मन अस्थिर होईल. जवळचे लोक मदत करतील. विरोधक कट करतील. वाहन जपून चालवा.
कन्या ः तुमचा महत्त्वाकांक्षी स्वभावात वाढ होईल. सावध रहा. प्रश्न सोडवता येईल घरातील समस्या सोडवता येईल.
तूळ : किरकोळ अडचणीवर मात करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नवीन परिचय झाल्याने उत्साह वाढेल.
वृश्चिक : तुमच्या कार्याला दिशा मिळेल. धंदा वाढेल. ओळखी वाढतील. मान-सन्मान मिळेल.
धनु : तणाव कमी होईल. जुनी चूक सुधारता येईल. कल्पनाशक्तिला चालना मिळेल. प्रेमात यश मिळेल.
मकर : उतावळेपणा कुठेही करू नका. ठाम निर्णय घेतांना योग्य सल्ला घ्या. खाण्याची काळजी घ्या.
कुंभ : आज तुम्ही सावधपणे बोला. नकळत चूक होईल. भावनेच्या आहारी जाऊन वागू नका. नम्र रहा.
मीन : आज महत्त्वाचे काम यशस्वी करता येईल. साहित्याला नवा विषय मिळेल. प्रतिष्ठा मिळेल. धंदा वाढेल.