राशीभविष्य शनिवार २५ जानेवारी २०२०

Horoscope 44
राशीभविष्य

मेष : तुमच्या क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल. डावपेच यशस्वी होतील. प्रेमाला चालना मिळेल. धंद्यात जम बसेल. शेअर्समध्ये फायदा होईल.

वृषभ : प्रयत्नाने यश मिळवण्याचा प्रयत्न करा. तुमचे धैर्य टिकवून ठेवा. मदतीची जास्त अपेक्षा ठेऊ नका. धंद्यात गरजेपुरते मिळेलच.

मिथुन ः मनाविरुद्ध घटना घडण्याची शक्यता निर्माण होईल. विरोध होईल. रागावर नियंत्रण ठेवा. बोलण्यापेक्षा काम करा.

कर्क : घरातील व्यक्तींसाठी वेळ द्यावा लागेल. भेटी होतील. प्रवासात नवीन परिचय होईल. धंद्यात वाद वाढवू नका.

सिंह : आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते. विरोधक निशाना साधण्याचा प्रयत्न करतील. धंद्यात मजूर वर्ग चिंता वाढवतील.

कन्या ः प्रयत्नाला यश येईल. कठीण काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आजचे काम आजच करा. भेट घेण्यात, चर्चा  करण्यात यश मिळेल.

तूळ ः किरकोळ कारणाने तणाव होऊ शकतो. प्रवासात सावध रहा. जास्त भावूक होऊ नका. धंद्यात प्रयत्न करा. पैसा मिळेल.

वृश्चिक ः कोणत्याही गोष्टींचा अतिरेक करू नका. जवळचे लोक गैरफायदा घेतील. राजकारणात असा अनुभव येऊ शकतो. जिद्द ठेवा.

धनु ः- तुमच्या कार्यक्रमात इतरांचे सहकार्य मिळेल. धंदा वाढेल. आप्तेष्ठांची भेट होईल. घर, वाहन, जमीन इ. खरेदीचा विचार कराल.

मकर ः- तुमचा संताप तुम्हीच आवरू शकता. नवीन मैत्री मिळतील. धंद्यात नवा विचार उपयुक्त ठरेल. ध्येयावर लक्ष द्या.

कुंभ ः- अडचणी येतील. ठरविलेल्या योजनेत तणाव होऊ शकतो. प्रकृतीची काळजी घ्या. वाहन जपून चालवा.

मीन ः- युक्तीने काम करून घेण्याचा प्रयत्न करा. अनोळखी व्यक्तींशी एकदम मैत्री वाढेल. परंतु व्यवहार करण्याचा उतावळेपणा करू नका.